महाराष्ट्र राज्याच्या उद्योग, पर्यटन,क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मा. आदिती तटकरे यांच्यासोबत आमदार राजेंद्र राऊत यांची, बार्शीच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) बाबत आढावा बैठक झाली.
सदर बैठक बोलावण्याची मागणी आमदार राजेंद्र राऊत व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्राद्वारे केली होती.
आज मुंबई येथे राज्यमंत्री मा.आदिती तटकरे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत बार्शीतील एम.आय.डि.सी. निर्माणच्या सद्यस्थितीच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
सदर बैठकीत आमदार राजेंद्र राऊत यांनी येथील भूखंडाचे दर जास्त असल्यामुळे ते विक्रीस बाधा येत आहे. त्यामुळे भूखंडाचे दर कमी करण्याची मागणी केली.
तसेच एम.आय.डी.सी. करीता बार्शी नगर परिषदे मार्फत अल्पदरात पाणीपुरवठा देण्याची ग्वाही दिली.सदर ठिकाणी नवीन वीज उपकेंद्राची उभारणी तातडीने करण्यासंबंधी मागणी करण्यात आली असून,यापूर्वीही त्यांनी ऊर्जामंत्री मा. नितीन राऊत यांना या ठिकाणच्या वीज उपकेंद्र उभारणीबाबत पत्र व्यवहार केलेला आहे.
यावेळी मंत्रीमहोदयांनी बैठकीतील या सर्व चर्चेनंतर येत्या १५ दिवसांत औद्योगिक विभागाचे सहसचिव व संबंधित अधिकाऱ्यांनी बार्शीला भेट देऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या.
त्याचप्रमाणे मा. मंत्री महोदयांकडे आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी शहरातील क्रीडा संकुलाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली. सदरची निधीची मागणीला त्यांनी सकारात्मकपणे प्रतिसाद देऊन क्रीडा संकुलाच्या विकासासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे सूचना संबंधितांना केल्या.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक