बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना रुग्णांवर उपचार करताना येत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, व इतर औषधे सामग्रीचा तुटवडा यांवर मात करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत मागील अनेक दिवसांपासून युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
बार्शी शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करताना येत असलेला अडी-अडचणींवर मात करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत हे मुख्यमंत्री महोदय, आरोग्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, जिल्ह्याचे पालक मंत्री, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व प्रशासनातील सर्वांसोबत सतत संपर्कात आहेत.
आज शुक्रवार दि 23 एप्रिल रोजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांच्याकडे फलटण येथील एम.आय.डी.सी. मधील सोना ॲलाॅय कंपनीच्या एम.टी.सी. ग्रुपने बंद ऑक्सिजन प्लॅंट चालविण्यासाठी घेतलेला आहे. या ऑक्सीजन प्लॅंट मधून बार्शी तालुक्यात 300 ऑक्सिजन सिलेंडर मिळणे बाबतची मागणी ई-मेल द्वारे पत्र पाठवून व फोनवर चर्चा करून केली आहे.
यामध्ये त्यांनी बार्शी शहर व तालुका येथील कॅन्सर हॉस्पिटल, हिरेमठ हॉस्पिटल, वैराग येथील संतनाथ हॉस्पिटल, सोमाणी हॉस्पिटल, सातपुते हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल, कुलकर्णी हॉस्पिटल, सुविधा हॉस्पिटल, शहा हॉस्पिटल, अंधारे हॉस्पिटल, मांजरे हॉस्पिटल या ठिकाणच्या कोवीड हॉस्पिटलला कोरोना रुग्णांवर उपचार करताना सातत्याने ऑक्सिजन कमी पडतो आहे. याठिकाणी होणारा ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
बार्शीचे सुपुत्र नरेंद्र, संजय व मनोज मेहता बंधूंच्या एम.टी.सी. ग्रुप सोना ॲलाॅय कंपनीने, लोणंद तालुका फलटण येथील बंद ऑक्सिजन प्लॅंट चालू करण्यास घेतला आहे. त्या प्लॅंटवर सोमवार पासून उत्पादन चालू होणार आहे. त्याठिकाणी दररोजचे उत्पादन हे 2400 ऑक्सिजन सिलेंडर तयार होणार आहेत. यातील बार्शी तालुक्यात करिता 300 ऑक्सिजन सिलिंडर देण्याची मेहता कुटुंबाची इच्छा आहे. तरी आपण सातारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बार्शी तालुक्यास 300 ऑक्सीजन सिलेंडर भरून आणण्यास परवानगी घ्यावी अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद