भाजपा जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत व तेथील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार माझ्याकडे सदरची कामे सुचविली.त्यांनी सुचविलेल्या विकास कामांकरीता मी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे पत्राद्वारे सदरच्या कामांची व त्यांच्या निधीची मागणी केली होती. या मागणीनुसार बार्शी तालुक्यातील १०१ गावांतील,अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे करिता ४ कोटी ७७ लाख ९६ हजार रुपयांचा निधी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मंजूर झाला आहे.
सदरचा निधी बार्शी तालुक्यातील गोरमाळे,धोत्रे, उक्कडगाव,घोळवेवाडी, घारी, जामगाव पा, आंबेगाव, आळजापुर, सावरगाव,झाडी,इंदापूर, भातंबरे, सारोळे, उपळे दु,गौडगाव,संगमनेर,निंबळक,पांगरी, आगळगाव, कुसळंब, देवगाव,कांदलगाव,मांडेगाव, पिंपळगाव धस,सौंदरे,ममदापूर,बावी आ, मळेगाव, घाणेगाव, हिंगणी,पिंपळगाव पा, तांदुळवाडी, पाथरी, साकत, महागाव, हळदुगे,धामणगाव दु,रातंजन, ज्योतीबाचीवाडी,लाडोळे,भोईंजे,काटेगाव,खडकोणी, खांडवी, कोरफळे,कव्हे, कासारवाडी,उपळाई ठों, सासुरे,सुर्डी,राळेरास,श्रीपत पिंपरी, इत्यादी १०१ गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे करिता वापरण्यात येणार असून,त्यामध्ये या दलित वस्त्यांमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण,हायमास्ट दिवे लावणे,एल.ई.डी.स्ट्रीट लाईट बसविणे, पेविंग ब्लॉक रस्ता करणे,नवीन गटार बांधकाम, नवीन बंदिस्त गटार बांधणे,समाज मंदिर बांधणे, आरो प्लांटची उभारणी करणे इत्यादी प्रकारची विकास कामे करण्यात येणार आहेत.
यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले, माजी जि.प.सदस्य संतोष दादा निंबाळकर, जि.प.सदस्य मदन दराडे,किरण मोरे,समाधान डोईफोडे,प्रमोद वाघमोडे, अविनाश मांजरे,इंद्रजीत चिकणे,राजाभाऊ धोत्रे,सुमंत गोरे,उमेश बारंगुळे उपस्थित होते.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक