आज बार्शी येथे आ.तानाजी सावंत यांच्या भगवंत इन्स्टिट्यूट येथील भव्य कोविड सेंटर च्या उद्घाटन कार्यक्रमास विकास मंत्री एकनाथजी शिंदे उपस्थित होते त्यांच्याकडे
आमदार तानाजी सावंत , आमदार राजेंद्र राऊत , नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी यांनी बार्शी नगरपरिषदेस ऑक्सीजन प्लांट उभारणी करीता निधीची मागणी केली होती तात्काळ दोन कोटी रुपयांच्या निधी मंजुरीची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली व या संदर्भातील आदेश मंत्रालयाला दिले या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करत मंत्रालयाने आदेश काढून रक्कम संबधित खात्याकडे वर्ग केली आहे हा निधी
राज्यातील नगरपरिषदांना , वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते . सदर योजनेचे सुधारीत निकष व मार्गदर्शक तत्त्वे संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले आहेत .शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यतेचे आधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.शासन निर्णयान्वये सन २०२०-२१ करिता रक्कम रु .१०५७.१४ कोटी रक्कम नगरपरिषद प्रशासन संचालनालय,मुंबई यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे . राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी नगरपालिकांना “ नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ” या योजनेंतर्गत निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या नुसार प्रादुर्भावर उपाययोजना करण्यासाठी बार्शी नगरपरिषद,जि.सोलापूर यांस “ नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ” या योजनेअंतर्गत रक्कम रु .२,००,००,००० / – ( अक्षरी रक्कम रुपये दोन कोटी मात्र ) इतका निधी वितरीत करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आली आहे.कोव्हीड -१९ च्या प्रादुर्भावावर त्वरीत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने एक विशेष बाब म्हणून सदर निधीबाबत प्रशासकीय मान्यतेचे आधिकार संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना राहतील
व यामध्ये कुठलीही वित्तीय अनियमितता असूनये असे या शासन निर्णयात नमूद केले आहे.


More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले