
बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी चे निकाल जाहीर झाले. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेचे संस्थापक मामासाहेब जगदाळे यांच्या कारकीर्दीत व नंतरही बर्याच काळात बिनविरोध निवडीची परंपरा राहीली आहे.
या निवडणुकीत पंधरा जागांपैकी यदाच्या निवडणुकीत पेट्रन गटातून डॉ बी.वाय.यादव,व्हाइस बेनिफॅक्टर गटातून डॉ गुलाबराव पाटील,व्हाइस पेट्रन फेलो गटातून तानाजी शिनगारे,कायम सभासद गटातून राजेंद्र पवार,डॉ . विलास देशमुख,लाइफ वर्कर गटातून विष्णू पाटील व दिलीप रेवडकर हे सात जण बिनविरोध झाले होते सात जागा बिनविरोध झाल्या आहेत,तर उर्वरित आठ जागांसाठी नऊ अर्ज असल्याने निवडणूक लागली होती पहिला वर्ग व दुसरा वर्ग प्रवर्गातील
आठ जागासाठी अनुक्रमे दिलीप मोहिते २८ जयकुमार शितोळे -२८ प्रकाश पाटील -२८
सुरेश पाटील -२६,अरुण देबडवार -२६ सोपान मोरे -२५,
शशिकांत पवार -२४,, नंदकुमार जगदाळे -२३ मते मिळवून विजयी झाले.
या निवडणुकीत एकूण ९ उमेदवार निवडणुकीत उभे होते ३३ सभासदापैकी झालेल्या मतदानात ३० जणांनी मतदान केले.
यात डॉ.प्रकाश बुरगुटे यांना सर्वात कमी मते मिळाल्याने पराभवास सामोरे जावे लागले.
या निवडणुकीसाठी श्री चव्हाण जी.ए.तसेच श्री एस आर.गपाट यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
More Stories
सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली शिक्षा
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक