Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > बार्शी येथे सोलापूर मराठा आक्रोश मोर्चा नियोजन बैठक संपन्न

बार्शी येथे सोलापूर मराठा आक्रोश मोर्चा नियोजन बैठक संपन्न

मित्राला शेअर करा

आण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष,आमदार नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत,रविवार दि.४ जुलै २०२१ रोजी सोलापूर येथे होणाऱ्या मराठा आरक्षण आक्रोश मोर्चाच्या नियोजन संबंधी सकल मराठा समाज बार्शीची बैठक संपन्न झाली.

मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाज अस्वस्थ झाला असून,आता त्यांच्यावर आरक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.सन १९८२ पासून मराठा समाज आरक्षणाची लढाई लढत आहे.मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांनी दिले.त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठ्यांना आता पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा व उदासीनतेमुळेच मराठा समाजाचे आरक्षण मा.सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही.आज राज्यात मराठा आरक्षण,ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण,मागासवर्गीय पदोन्नती रद्द निर्णयामुळे राज्यातील जनता आघाडी सरकारवर नाराज असून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होत आहे.इत्यादी आरक्षण देण्यासंदर्भात मुद्द्यांवर या नियोजन बैठकीत चर्चा करण्यात आली

आदर्श लाॅन्स याठिकाणी झालेल्या या बैठकीस आमदार नरेंद्र पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख , भाजपा जिल्हा समन्वयक, सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील,नगराध्यक्ष अ‍ॅड. आसिफभाई तांबोळी , पंचायत समिती सभापती अनिल काका डिसले , अरूण दादा बारबोले , रावसाहेब मनगिरे, नगरसेवक,पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर व सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.