Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > बार्शी शहरात पावसाळ्या पूर्वीची गटारी,ओढे-नाले स्वच्छतेची कामे सुरू

बार्शी शहरात पावसाळ्या पूर्वीची गटारी,ओढे-नाले स्वच्छतेची कामे सुरू

मित्राला शेअर करा

येऊ घातलेल्या पावसाळ्याच्या अनुषंगाने बार्शी शहरात ओढे-नाले, गटारी तुंबणार नाही, पाणी तुंबणार नाही, रोगराई पसरू नये म्हणून घ्यावयाची काळजी,उपाययोजना, खबरदारी व पूर्वतयारी बार्शी नगर परिषदेमार्फत आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे.

बार्शी शहरातील सर्व गटारी,ओढे-नाले यांमधील गाळ काढून त्याचा निचरा करणे, स्वच्छता करण्यासाठी लागणारी वाहने,जे.सी.बी. मशीन, स्वच्छता कंत्राटी कामगार, औषधे फवारणी आदी गोष्टींच्या सहाय्याने पावसाळ्यापूर्वी येणाऱ्या २० ते २० दिवसांत तातडीने स्वच्छतेची कामे सुरु करून बार्शी शहर स्वच्छ करण्याच्या सूचना आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलेल्या आहेत.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, बार्शी नगर परिषदेमार्फत पावसाळ्या पूर्वीची घ्यावयाची स्वच्छतेची कामे, बार्शी शहरात रोगराई पसरू नये म्हणून घ्यावयाची काळजी व उपाययोजना राबविण्याचा दृष्टीने पावसाळ्या पूर्वीची गटारी ओढे-नाले स्वच्छतेची कामे सुरू करण्यात आलेली आहेत.

बार्शी शहरातील गटारी, ओढे-नाले स्वच्छतेची कामे हे आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी सौ. अमिता दगडे पाटील मॅडम, पक्षनेते विजय नाना राऊत, गटनेते दिपक राऊत, आरोग्य सभापती संदेश काकडे,पाणीपुरवठा सभापती संतोष भैय्या बारंगुळे, आरोग्याधिकारी ज्योती मोरे यांच्या देखरेखीखाली सुरू असून, येणाऱ्या १५ दिवसांत तातडीने स्वच्छतेची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

सद्या बार्शी शहरात सोमवार पेठ -भवानी पेठ विभागाचे स्वच्छता निरीक्षक दीपक काकडे, शिवाजीनगर विभागाचे स्वच्छता निरीक्षक शब्बीर वस्ताद, सुभाष नगर विभागाचे स्वच्छता निरीक्षक नितीन शेंडगे, डॉ. प्रकाश लंकेश्वर, हर्षल पवार यांचा स्वच्छता कर्मचारी वर्ग गटारी, ओढे-नाले स्वच्छतेची कामे जे.सी.बी.मशीन व गाळाचा निचरा करण्यासाठी लागणारी वाहने यांच्या मदतीने करत आहेत.