
उद्या दि. ०४/०७/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वा. ते सायं. ०७.०० वा. पर्यंत मराठा आरक्षण आक्रोश मोर्चा अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराज चौक ते पुनम गेट (जिल्हा परिषद) पर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी व नागरिकांना येण्या-जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे.
१)सोलापूर शहरात कोरानाचा प्रादुर्भाव वाटुन मानवी आरोग्यास व जिवतास धोका निर्माण होवू शकतो,
त्यामुळे, कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता अत्यावश्यक कामाशिवाय सार्वजनिक
ठिकाणी येण्यास मनाई राहील,
२) त्यामुळे सोलापूर शहरात कोरानाचा प्रादुर्भाव वाढून मानवी आरोग्यास व जिवीतास धोका निर्माण होवू
शकतो. म्हणून सोलापूर शहरात येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना अत्यावश्यक सेवा वगळून)
प्रवेशास/ वाहतूकीस बंदी राहील
सदर बाबींचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना भरतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८, व इतर कायद्यामधील तरतूदीनुसार फायदेशीर दंडनीय कारवाईस पात्र असून त्यांच्या विरुद्ध
पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करावी. असे आयुक्त अंकुश शिंदे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
More Stories
यशवंत विद्यालय खांडवी ता. बार्शी तील विद्यार्थ्यांची विधानभवनाला अभ्यास भेट, लोकशाहीच्या कार्यप्रणालीचा घेतला अनुभव
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे