काल सोलापुर दौऱ्यावर युवराज संभाजीराजे आले होते.त्यावेळी चर्चेदरम्यान व्याख्याते हर्षल बागल यांनी संभाजी महाराज मराठा हा हिंदु आहे.देशात बहुमतात हिंदुत्ववादी सरकार आहे. कश्मिरचे ३७० कलम रद्द होते.राममंदिराचा मुद्दा निकाली निघाला.मग हिंदु असलेल्या मराठ्यांना केंद्रातील हिंदुत्ववादी विचारांचे सरकार संसदेत कायदा करुन आरक्षण का देऊ शकत नाही असे विचारताच युवराज संभाजी राजे यांनी हिदुंत्वाचे नाव निघताच शेजारी बसलेल्या भाजपाच्या सुभाष देशमुखांकडे बोट दाखवले.
राजे आपण सुध्दा याच हिदुंत्ववादी सरकारच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती नियुक्त खासदार झालात.मग सुभाष देशमुखांकडे बोट दाखवुन केंद्रातील जबाबदारी का झटकताय का असा सवाल हर्षल बागल यांनी केला.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपीला सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली शिक्षा
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश