एकीकडे राज्यात आडवाआडवी चे प्रयोग होत असताना दुसरीकडे
महाराष्ट्राच्या मदतीला धावला आंध्र प्रदेश 300 व्हेंटिलेटर देण्याच घोषणा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी केली
कोरोना प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका देशात महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अखंडपणे लढत आहे. महाराष्ट्र केंद्राकडे वारंवार रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्ससाठी मागणी करत आहे. महाराष्ट्रावर ओढावलेल्या संकट काळात आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावून आले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती केली होती. त्यानंतर महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे.
कठीण वेळी, मौल्यवान जीव वाचविण्यात हे व्हेंटिलेटर्स महत्त्वपूर्ण ठरतील. त्वरेने केलेल्या कृतीबद्दल गडकरी यांनी राज्याच्या नागरिकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले

More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक