बार्शी (दि 29 मार्च ): शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षेत अतिरिक्त गुण देऊन त्याच्या कला कौशल्याचा सन्मान आजपर्यंत शासन करीत होते पण त्याच योगदानाला दुर्लक्षित करण्याचा चुकीचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिनांक 26 मार्च 2021 रोजी घेतला आहे. एप्रिल 2021 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10वी) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षेचे अतिरिक्त सवलतीचे गुण देण्यात येऊ नये असा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे.या शासन निर्णयाचा महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ,सोलापूर जिल्हा वतीने निषेध करण्यात आला.
या निर्णयामुळे शिक्षण प्रवाहातील कला विषयाचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.मुलांनी ग्रेड परीक्षा देऊनही त्यांना सवलतीचे गुण मिळणार नसतील तर हा विध्यार्थी,पालक , कलाशिक्षक आदींवर अन्याय होणार आहे असे मत महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष विनोद इंगोले यांनी व्यक्त केले संघाचे राज्य सरचिटणीस प्रल्हाद साळुंखे यांनी शासनाने 26 मार्च 2021 च्या परिपत्रकातील दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा रद्द करून यंदा एप्रिल 2021 मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या व ज्यांनी यापूर्वीच शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना अतिरिक्त सवलतीचे गुण देण्याबाबत शासन निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
राज्य उपाध्यक्ष किरण सरोदे विभागीय कार्याध्यक्ष रामचंद्र इकारे जिल्हाध्यक्ष संजय पवार सचिव सावता घाडगे,उपाध्यक्ष अमित वाडेकर,नाथा लोंढे,जिल्हा मार्गदर्शक राजेंद्र जाधव, कोषाध्यक्ष शिवभूषण ढोबळे सहसचिव विशाल सरतापे ,नितीन मिरजकर, संदीप शाह,सुहास गायकवाड,संतोष उपरे,नितीन मिरजकर, संतोष कदम,शोभा बिराजदार,रजनी चौरे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष ,पदाधिकारी व कलाशिक्षक बंधू भगिनींनी निषेध नोंदविला
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद