
भारत सरकारच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित ९ निकषाची अंमलबजावणी करण्यात येत आहे या अनुषंगाने बार्शी तालक्यातील I.S.O मानांकन असणारी, अग्रेसर शिक्षक व विद्यार्थी संख्या असणारी, जिल्यात नावलौकिक असणारी शाळा महाराष्ट्र विद्यालय बार्शी २०२१-२०२३ या शैक्षणिक वर्षात तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे. आरोग्य विभागाने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखू मुक्त व आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारीत नऊ निकषांना पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक श्रीम. शुभांगी लाड, सारथी फाउंडेशनचे समन्वयक श्री.रामचंद्र वाघमारे, समन्वयक श्री.विवेकानंद जगदाळे (मुख्याध्यापक जि.प.शाळा.नागोबाचीवाडी)
यासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, संस्था सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी.बी.पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच नोडल शिक्षक श्री.संग्राम देशमुख सर, अतुल नलगे सर यांनी नवीन निकषानुसार तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी परिश्रम घेतले व प्रशालेतील सहशिक्षक श्री.लांडगे सर, सहशिक्षिका श्रीमती साठे मॅडम, पर्यवेक्षक श्री.जी.ए.चव्हाण सर यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले
शाळा तंबाखूमुक्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष श्री. नंदन जगदाळे, सचिव श्री. व्हि.एस.पाटील ,सहसचिव श्री.पी.टी.पाटील सर, खजिनदार श्री रेवडकर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जयकुमार शितोळे बापू यांनी प्रशालेचे अभिनंदन केले.

More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक