मुंबई, दि. 5 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दि. 6 जून हा दिवस सर्व महाविद्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे.अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
श्री.सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दिनांक 6 जून हा दिवस सर्व महाविद्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.यानुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे,स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये,अभियांत्रिकी महाविद्यालये,तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’साजरा होणार आहे.याबद्दलचे शासन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे,असेही श्री.सामंत यांनी सांगितले.
More Stories
यशवंत विद्यालय खांडवी ता. बार्शी तील विद्यार्थ्यांची विधानभवनाला अभ्यास भेट, लोकशाहीच्या कार्यप्रणालीचा घेतला अनुभव
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे