Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > मोहोळ येथे DCHC कोविड सेंटर उभे करा अन्यथा आमरण उपोषण :अ‍ॅड श्रीरंग लाळे

मोहोळ येथे DCHC कोविड सेंटर उभे करा अन्यथा आमरण उपोषण :अ‍ॅड श्रीरंग लाळे

मित्राला शेअर करा

मोहोळ प्रतिनिधी-मोहोळ येथे सुसज्ज शासकीय डेडीकेटेड कोविड केअर हॉस्पिटल ( DCHC ) कार्यरत न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन अ‍ॅड. श्रीरंग दत्तात्रय लाळे यांनी प्रशासनाला दिले आहे.. या निवेदनात त्यांनी म्हटले आहेकी, १०४ गावे व एक नगरपरिषद असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एकही शासकीय डेडिकेटेड कोविड केअर सेंटर नाही . तालुक्याचा मृत्युदर हा झपाट्याने वाढत आणि आणि त्याला कारण म्हणजे तालुक्यात एकही DCHC नाही . त्यामुळे रुग्ण घरीच उपचार घेतल्याने मोठ्या प्रमाणावर दगावत आहेत . ही बाब अत्यंत चिंताजनक आहे . त्यामुळे मोहोळ तालुक्यात DCHC करावे या मागणीसाठी आपल्याला याआधी वारंवार इमेल करून , निवेदन देऊन व प्रत्यक्षात भेटून तसेच मा . तहसिलदार श्री.जीवन बनसोडे यांना फोन वरून संपर्क करून विनंती केलेली होती व आहे .अद्याप यासंदर्भात आपल्या कार्यालायकडून कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही किंवा तसे पत्र , ई – मेल अद्याप आलेला नाही . दि .२४ / ०४ / २०२१ रोजी मोहोळ पंचायत समिती येथे मिटिंग झाली असता पालकमंत्री श्री.दत्तात्रय भरणे साहेब , मोहोळचे आमदार श्री.यशवंत माने साहेब , सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिलीप स्वामी यांनी १ मे २०२१ रोजी मोहोळ येथे सर्व कोविड उपचारांनी सुसज्ज व २५ प्राणवायू उपलब्ध असणारे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर उभारणार असल्याचे व त्या दिवशी पासून रुग्णांना उपचार देणार असल्याचे सांगून उपोषण स्थगित करण्याच्या संदर्भात चर्चा केलेली होती . त्यानुसार १ मे पर्यंत आमरण उपोषण स्थगित केले होते . परंतु १ मे रोजी मदरच्या हॉस्पिटलचे उद्घाटन होऊन तेथे उपचार सुरु न झाल्यास १ मे दुपारी चार वाजल्यापासून पुढे आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे सदरच्या निवेदनाच्या अनुषंगाने जर १ मे २०२१ च्या आत सर्व कोविड उपचारांनी सुसज्ज व २५ प्राणवायू उपलब्ध असणारे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर न सुरु झाल्यास मोहोळ तहसिलदार कार्यालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचे सदरच्या निवेदन पत्राद्वारे कळविण्यात त्यांनी कळविले आहे आहे . प्रशासनाच्या कायम सहकार्याच्या भूमिकेत असतो आणि अजूनही आहे . परंतु मोहोळ तालुक्यातील रुग्णांचे मृत्यदर व हालअपेष्टा बघता आणि या परिस्थितीचा वेळोवेळी संदर्भ देऊनही उपाययोजना होत नसतील तर सदरचे महात्मा गांधीजी यांनी अवलंबिलेल्या सविनय कायदेभंगाच्या मार्गाने आमरण उपोषण आवश्यक आहे . तरी येत्या ०१/०५/२०२१ रोजी दुपारी चार वाजलेपासून आमरण उपोषणाम सुरुवात करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी.असा इशारा अ‍ॅड.श्रीरंग लाळे यांनी दिला आहे.