Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

मित्राला शेअर करा

भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष छायाताई भगत यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्व मराठा संघ धाराशिव व ग्रामपंचायत पाटसांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .


कोरोना कालावधीत होत असलेली रक्ताची कमतरता याची जाणीव ठेवत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा.कविताताई उमेश नायकिंदे सरपंच व सुनिल फुलारी सहप्रमुख विश्व जन आरोग्य सेवा समिती मराठवाडा यांच्या उपस्थितीत जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करुन रक्तदान शिबिरास सुरुवात केली.यावेळी या शिबिरामध्ये ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी विश्वजन आरोग्य सेवा समितीचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष विश्व मराठा संघ धाराशिव सोमनाथ कोकाटे, विश्व मराठा संघ महिला जिल्हाध्यक्षा अर्चना माने, विश्व मराठा संघ जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब दळवी, विश्व मराठा संघ महिला भुम तालुकाध्यक्ष योगिता मिसाळ, विश्व तालुका समन्वयक किशोर गटकळ, आरोग्य समन्वयक परंडा सदस्य रविंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य आदीसह नागरिक उपस्थित होते.