बार्शी शहरातील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे आज आमदार राजेंद्र राऊत व वीरशैव लिंगायत समाजाचे पदाधिकारी, समाज बांधव यांच्यामध्ये कोरोनाचे नियम पाळत सोशल डिस्टंन्स,मास्क वापरत बैठक झाली.
बैठकीच्या पूर्वी आमदार राजेंद्र राऊत व लिंगायत समाज बांधवांनी स्मशानभूमी मध्ये सुरू असलेल्या सुधारणा, सुशोभीकरण याची संपूर्ण पाहणी केली.
सदर बैठकीत प्रास्ताविक करताना वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष, नगरसेवक मा.विलास आप्पा रेणके यांनी स्मशानभूमी मध्ये सध्या सुरू असलेल्या सुधारणा व सुशोभीकरणाबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे लिंगायत समाजात काम करत असताना येणाऱ्या अडी-अडचणी, प्रश्न, समस्या सांगितल्या.त्याचबरोबर आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यपद्धतीचा पैलू सांगताना ते म्हणाले की, आपण जर कामकाजाबाबत एखादा शब्द दिला, तर तो शब्द आपण कोणतीही सबब न देता पाळतात व पूर्ण करतात.याचमुळे आम्हीं आपणाकडे समाजाच्या वतीने निवेदन देऊन काही मागण्या मांडत आहोत. आम्हांला संपूर्ण खात्री आहे की, त्या तुम्हीं पूर्ण करणारच.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, वीरशैव लिंगायत समाजाने या बैठकीत मला बोलावून माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या सोबत काम करण्याची संधी दिली, त्याचप्रमाणे मला या ठिकाणी मन मोकळे करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. समाजाच्या वतीने स्मशानभूमीतील अंतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरण, पुरेशा प्रकाशासाठी नवीन दोन हायमास दिवे लावणे, प्रवेशद्वाराची नवीन आरसीसी कमान करण्याची मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. लिंगायत समाजाच्या या मागण्या मी लवकरच पूर्ण करणार असून त्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसहभागातून स्मशानभूमीत होत असलेल्या सुधारणा, सुशोभीकरण, वृक्षारोपणाचेही त्यांनी कौतुक केले.
याचबरोबर ते म्हणाले की, यापूर्वीही लिंगायत समाजाने माझ्याकडे मागणी केल्याप्रमाणे स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधून दिली. त्याचबरोबर स्मशानभूमीतील विधी करता डोजर ट्रॅक्टरची मागणी केलेली आहे. तीही मागणी पूर्ण करण्यात आली असून येत्या महिनाभरात नगर परिषदेच्या माध्यमातून नवीन डोजर ट्रॅक्टर उपलब्ध होणार आहे.
त्याचबरोबर ते म्हणाले की, लिंगायत समाजात माझ्या बद्दल गैरसमज निर्माण झालेला आहे.तो गैरसमज सर्वांनी मनातून काढून टाकून मला आपल्या सोबत घेऊन काम करण्याची संधी द्यावी. लिंगायत समाजाचा सामूहिक विवाह सोहळा, बेरोजगारीचा प्रश्न,बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे प्रश्न आदींबाबत माझ्याशी संपर्क साधून आपल्या सुख-दुःखात, समाजाच्या सण-समारंभ,उत्सवात मलाही सामील करून घ्यावे अशीही विनंती त्यांनी केली. समाजकारण, राजकारण करीत असताना मी अठरा-पगड जातींना सोबत घेऊन काम करत असून, कामांच्या माध्यमातून माझे त्यांच्याशी जिव्हाळयाचे नाते निर्माण होत आहे. त्याच पध्दतीचे नाते मलाही आपल्या लिंगायत समाजासोबत निर्माण करायचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
बार्शीच्या समाजकारण, राजकारणातील लिंगायत समाजाच्या योगदानाबद्दलही त्यांनी आवर्जून स्व.काकासाहेब झाडबुके, स्व.भाऊसाहेब झाडबुके, स्व. बाळासाहेब कथले, माजी नगराध्यक्ष आदरणीय बाबासाहेब मनगिरे,माजी आमदार आदरणीय श्रीमती प्रभाताई झाडबुके,आदी परिवारांचा उल्लेख केला.
या बैठकीस नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके,नगरसेवक प्रशांत कथले मालक, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक, मल्लीनाथ गाढवे, आप्पासाहेब गुडे, आप्पासाहेब साखरे, नागजी लामतुरे,अनिल बेणे, नगरसेवक रोहीत लाकाळ, मल्लिकार्जुन धारूरकर,बंडू वायकर, राहूल नांदेडकर, महेंद्र कथले,संदीप मठपती, प्रदीप हागरे,धनु धारूरकर, महेश गुडे,विवेकानंद देवणे, प्रवीण पावले,रवींद्र मैंदर्गिकर,हेमंत शाहीर,बापू धारूरकर, राजा स्वामी, नितीन बकाल,विलास नकाते, गणेश वाघमारे, सुनील फल्ले,अनिल शिरसागर,बाळासाहेब गाताडे, योगेश गाताडे, लिंगायत वाणी,गवळी, तेली,कोष्टी,माळी इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद