Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > व्हिडीओ:काय म्हणाले मुख्यमंत्री;वाचा सविस्तर

व्हिडीओ:काय म्हणाले मुख्यमंत्री;वाचा सविस्तर

मित्राला शेअर करा

राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले.या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला.जवळपास दोन महिन्यांपासून लागू असलेल्या या लॉकडाऊन नंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे.मात्र असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांत अद्यापही रुग्णसंख्या कायम असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्येत घट झाली आहे तेथील नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे ज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केली कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे. लस आली असली तरी सर्व लोकसंख्येला दोन डोस देण्यापर्यंत कालावधी जाणार आहे. तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती आहे. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे.महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला.सर्व जिल्ह्यांत तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्स तयार केल्या.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्देराज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवला राज्यात १५ दिवसांनी लॉकडाऊन वाढवलाकोरोनाच्या लाटेत अनेक बालकं अनाथ झाली सर्व जिल्हे कोरोनामुक्त झाली तर राज्य कोरोनामुक्त होणारकोरोनामुक्त गाव राज्य सरकारची नवी मोहिमकोरोनामुक्त गाव ही मोहीम आपल्याला आजपासून राबवायची आहेजर हे सरपंच आपले गाव कोरोनामुक्त करु शकतात तर इतर का नाही दक्षिण सोलापूर येथील कोमलताई मोहोळ तालुक्यातील ॠतूराज देशमुख यांनी आपलं गाव कोरोनामुक्त केलं आहेत हिवरे बाजार,घाटणे ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत घरे कोरोनामुक्त झाली तर गाव कोरोनामुक्त होणार प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं तर मी,माझं घर कोरोनामुक्त ठेवणार शहरी भागांत कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आहे ग्रामीण भागात थोडा प्रादुर्भाव आहे आपण सहकार्य केलं नसतं तर कोविडची दुसरी लाट थोपवता आली नसती, हा लढा अजूनही सुरू आहे लॉकाडाऊन असला तरी अर्थचक्र सुरू राहिलं पाहिजे शिक्षण सुरूच ठेवायचं आहे,ऑनलाईन ठेवायचं की आणखी काही करायच शिक्षण क्षेत्रात काही क्रांतिकारी निर्णय घेण्याची गरजदेशा साठी एक शैक्षणिक धोरण असायला हव बारावीच्या परीक्षेबाबत केंद्राने धोरण ठरवायला हव मी परीक्षेच्या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे दहावीचा निर्णय आम्ही घेतला बारावीच्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेणार आहोत परीक्षांच्या संदर्भात संपूर्ण देशभात शैक्षणिक धोरण एक असावंकोविड प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी महाराष्ट्राची साधारणत: सव्वादोन कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे येत्या काळात लसीकरणाचा वेग वाढवणार वयोमानाप्रमाणे म्हटलं तर कदाचित तिसरी लाट बालकांत येऊ शकते पहिली लाट वयोवृद्ध,दुसरी लाट तरुणांत आली होती कोविड विरुद्धचं युद्ध आपण नक्कीच जिंकू शकतो कोविड- नॉन कोविड ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे स्टेरॉईडमुळे म्युकरमायकोसिसचं प्रमाण वाढल पावसाळ्यात साथीचे रोग रोखण्याची गरज पावसाळ्यात साथीचे आजार आहेतच आणि त्यात कोरोनाचं संकट आहे राज्यात म्युकरमायकोसिसचे ३ हजार रुग्ण उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करावा लागला होता आणि नंतर तोही कमी पडला राज्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता १२०० मेट्रिक टन इतकीराज्याला दरदिवशी १७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागत होतीऑक्सिजन आता अवघ्या काही तासांसाठी राहिला आहे असे फोन मधल्या काळात येत होते आणि यामुळे घाम फुटत होता,प्रशासनाचे धाबे दणाणत होते दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे तिसरी लाट संपूर्णपणे आपल्या वागण्यावर अवलंबून असेल रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणे आवश्यक रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनची आवश्यकता सुद्धा वाढली तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे ग्रामीण भागात रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसत आहेराज्यातील काही जिल्हे असे आहेत तेथे रुग्ण संख्या हलकीशी वाढताना दिसत आहे आणि ती गोष्ट काळजीची आहेकडक लॉकडाऊन नाही पण निर्बंध कायम राहणारकडक लॉकडाऊन केलेला नाहीये, निर्बंध लागू आहेतबाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे या वेळी रिकव्हरी रेट हा खूपच दिलासादेणारा आहे साधारणत: १७ सप्टेंबर २०२९ रोजी २४ हजारांच्या आसपास रुग्ण होते तर २६ मे २०२१ रोजी २४ हजारांच्या आसपास रुग्ण संख्या होती म्हणजेच गेल्या लाटेतील सर्वोच्च रुग्ण संख्ये पेक्षा आता कुठे रुग्णसंख्या कमी होत आहेयावेळीचं संकट हे सणासुदीच्या आधी आलं आहेआज राज्यात १८ हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद झालीपण नाईलाजाने आपल्या जीवाच्या काळजीपोटी हे काम करावं लागतंनिर्बंध लादावे लागतात, त्याच्या सारखं वाईट काम कुठलं असेल असं मला वाटत नाही फेरिवाल्यांसाठी सुद्धा ५२ कोटींचा निधी आतापर्यंत दिला आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी १५४ कोटी ९५ लाखांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला कोरोनाच्या लढाईत आपण ज्या काही घोषणा केल्या त्यात अन्न पुरवठा वितरण, शिवभोजन थाळी मोफत दिली भूकंप रोधक घरांची निर्मिती करावी लागणार,अंडरग्राऊंड वीज कनेक्शन करावे लागणार किनारपट्टीच्या भागात ठोस उपाययोजना कराव्या लागणारलवकरच नुकसानग्रस्तांना मदत देण्यात येणारवादळामुळे नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली आहे तौैत्के चक्रीवादळाच्या दरम्यान प्रशासनाने चांगलं काम केल मी कोकणाचा धावता दौरा केलावादळ्याच्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून होतोअनेक ठिकाणी घरांचे नुकसान,वीज पुरवठा खंडित झाला होतातौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झाल कोरोनाच्या संकटात जिद्दीनं आणि निश्चयाने बंधने पाळली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेचे धन्यवाद मानले.