जय जगदंबा परिवाराचे संस्थापक सचिव शिक्षण महर्षि दलितमित्र बाळासाहेब नरहरी कोरके यांचे मंगळवारी मुंबई येथे अल्पश: आजाराने दुख:द निधन झाले. त्यांचे वय ६३ वर्ष होते.
त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शिक्षण महर्षि बाळासाहेब कोरके यांचे शिक्षण वैराग येथील विद्यामंदिर हायस्कुल, तडवळे येथील यशवंतराव चव्हाण प्रशाला, सोलापुर येथील हरिबाई देवकर, बार्शीच्या शिवाजी कॅालेज येथे पदवी शिक्षण झाले.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १९८७ साली जय जगदंबा परिवाराची स्थापना केली. गोरगरीबांची मूलं शिकावीत म्हणून बाळासाहेब कोरके यांनी ग्रामीण भागात ४ संस्था स्थापन केल्या आहेत. जय जगदंबा बहुद्देशिय संस्था सर्जापूर संचलित ४० शिक्षण संकुले, कालिकामाता शिक्षण प्रसारक मंडळ पानगाव यासंस्थेच्या शाखा तसंच जय भवानी महिला शिक्षण प्रसारक संचलित ५ शाखा, श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या ८ शाखा, अमरज्योती विद्यापुरंदर सोलापुर संचलित १ शाखा अशा एकूण ६३ शाखांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात घराघरापर्यंत पोहोचवली त्यांच्या निधनामुळं संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
शिक्षण महर्षि बाळासाहेब कोरके काळाच्या पडद्याआड
More Stories
यशवंत विद्यालय खांडवी ता. बार्शी तील विद्यार्थ्यांची विधानभवनाला अभ्यास भेट, लोकशाहीच्या कार्यप्रणालीचा घेतला अनुभव
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे