ना कद बडा होता है
ना पद बडा होता है।
बडा ओ होता है जो
इंसान को इंसान की तरह अपनाता है।
मनुष्य जन्माला येतो तेव्हा निष्पाप निरागस असतो.लहान बाळाला देवाचे रूप समजले जाते.जस जसा तो मोठा होत जातो तस तसा तो षढरिपूंनी वेढला जातो(काम, क्रोध,लोभ, मोह,मद,मत्सर)नशीबाने किंवा कर्माने त्याला एखादे पद,प्रतिष्ठा,खुर्ची मिळाली की त्याच्या स्वभावात बदल होतो.समोरचाबद्दल न्यूनगंड व स्वतःबद्दल अंहभाव त्याच्या स्वभावात येतो.मग तो आपल्या मना प्रमाणे वागायला लागतो.अशीच परिस्थिती आपल्याला आज अनेक ठिकाणी बघायला मिळते.काहि कार्यालयात तर अधिकारी इतक्या मुजोरीने,कुत्सितपणे बोलतात कि जणूकाही समोरच्या व्यक्तीने खूप मोठा गुन्हाच केला आहे.नेत्यांचीपण यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही त्यांनापण लोकांनी समाज सेवक म्हणून निवडून दिले असते पण ते सुद्धा स्वतःला मालकच समजायला लागतात.पद,प्रतिष्ठा मिळाल्यानंतर माणसाने समाज सेवा केली पाहिजे.नशिबाने अशी सेवेची संधी आलेली असते त्या संधीचे सोने केले पाहिजे. पण उलट तो पद ,प्रतिष्ठा,खुर्ची मिळाल्यानंतर ईतका मगरूर होवून जातो.तो स्वताला ताकदवान समजायला लागतो.पण तो हे विसरतो की समोरचे पण ताकदवान असतात.समोरचे विनम्र वागतात म्हणून आपल्याला कसाही वागण्याच्या परवाना आहे असा होत नाही.जेव्हा समोरचा व्यक्तीचा संयमाचा अंत होतो.तेव्हा तो या मगरूर माणसाला जागा दाखवल्याशिवाय राहत नाही.
एका ठिकाणी अनेक गायी असतात.त्यांना भुक लागलेली असते.म्हणून ते समोरच एक गवताच्या मोठा खच पडलेला असतो तिथे गवता खाण्यासाठी जातात. पण त्या गवतावर एक कुत्रा बसलेला असतो.तो कुत्रा स्वतःला त्या गवताच्या खचाचा मॅनेजरच समजतो.गायी अतिशय गरीब प्राणी ते गवत खाण्यासाठी जवळ येतात.गवत खावू देण्याची विनंती करतात.पण हा कुत्रा त्यांच्यावर भुंकायला लागतो.त्यांच्यावर गुर्र गुर्र करतो.त्या गायींना गवत खावू देत नाही.त्या गायी घाबरून पळत पळत बैलाकडे जातात त्याच्याजवळ कुत्र्याची तक्रार करतात.बैल गवताचा खचाजवळ येतो त्या कुत्र्याला विनंती करतो की या गायींना गवत खावू दे म्हणून.पण कुत्रा त्या बैलावर पण गुर्र गुर्र करायला लागतो. बैलाला संताप येतो.तो बैल एक जोराची लाथ कुत्र्याला मारतो.कुत्रा लगेच घाबरून पळून जातो
तात्पर्य हेच कि माणसाला पद,प्रतिष्ठा,खुर्ची मिळाली तरी माणसाने माणसासारखे वागणे सोडायला नको.
शब्दांकन श्री.यशवंत निकवाडे,सिंदखेडराजा.धुळे
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक