Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सोजर कॉलेज ऑफ फार्मसी बार्शी येथे डी-फार्मसी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू.

सोजर कॉलेज ऑफ फार्मसी बार्शी येथे डी-फार्मसी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू.

मित्राला शेअर करा

सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील खांडवी येथील सोजर कॉलेज ऑफ फार्मसी सुविधा केंद्रावर (FC6504) डी-फार्मसी प्रवेशासाठी मोफत मार्गदर्शन केंद्र व ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.या प्रक्रियेद्वारे ऑनलाईन अर्ज 02 ऑगस्ट 2021 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. प्रथम वर्ष पदवीका (डी-फार्मसी) अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयाला शासनमान्य सुविधा केंद्र मंजूर केले आहे.तसेच सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सध्या बारावीच्या निकालाची वाट पाहण्याची आवश्यकता नसून विद्यार्थ्यांचा परीक्षा बैठक क्रमांक नमूद करून अर्ज भरण्याची सोय महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे,अशी माहिती प्रा.सुजित करपे यांनी दिली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रिया व अर्ज पडताळणीसाठी विद्यार्थ्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. प्रथम पर्यायांमध्ये सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज भरणे,सत्यप्रती तपासणी,पडताळणी व निश्चिती करणे तर दुसऱ्या पर्यायांमध्ये विद्यार्थी सुविधा केंद्रावर न जाता ऑनलाइनचा वापर करून अर्ज भरावा,असे आवाहन संस्थाअध्यक्ष अरुण(दादा) बारबोले व प्रा.सुजित करपे यांनी केले आहे.