काँग्रेसचे कार्यकर्ते आ. प्रणिती शिंदे यांचे समर्थक, मोची समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय चाळीस होते त्यांच्या पश्चात पत्नी व मुले असा परिवार आहे.
करण म्हेत्रे यांना कोरोनाची लागण झाल्याने मुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते दरम्यान नंतर विनीत या हॉस्पिटलमध्ये पुढे शिफ्ट करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समजली. मृत्यूची माहिती मिळताच कार्यकर्ते त्या हॉस्पिटलच्या परिसरात जमा झाले, आपला नेता गेल्याने कार्यकर्त्याचा आक्रोश दिसून आला. माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती होते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांचे ते समर्थक मानले जात होते. मोची समाजात त्यांच वजन होतं. आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पुढाकार दिसून यायचा. गरीब कुटुंबातून मोठ्या मेहनतीने यांनी समाजात वेगळे स्थान मिळवले होते, ताडीच्या विरोधात ते आक्रमक होते. मोची समाजातील युवकांसाठी त्यांनी जिम स्वखर्चाने जिम बांधली होती, समाजातील धडपडीचा युवा नेता कोरोनाचा बळी ठरल्याने मोची समाजातून दुःख व्यक्त होत आहे.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर