जिल्ह्यातील अंगणवाडी इमारत बांधकामासाठी चालू वर्षी १३.७० कोटी निधी मंजूर झाला आहे.तसेच जिल्हा परिषदेच्या सेसमधून ग्रामीण भागातील मुलींना साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी महिला बालकल्याण विभागामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.
महिला व बालकल्याण विभागामार्फत शासनाकडील आदर्श अंगणवाडी योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.१०० अंगणवाड्यांची स्मार्ट अंगणवाडी किटसाठी निवड करण्यात आलेली आहे.
ग्रामीण भागातील अंगणवाडी लाईटीग सिस्टीम,ई-लर्निंग सॉफटवेअर स्वच्छ भारत कीट,वॉटर प्युरिफायर हँडवॉश बेसिन,एज्युकेशनल पेंटींग चार्टस आदी साहित्य मिळणार आहे तसेच अंगणवाडी केंद्राची डागडुजी व दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे.
हे साहित्य टप्प्याटप्प्याने सप्टेंबरपर्यंत अंगणवाडी स्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे चालू वर्षी २०२१-२२ मध्ये सर्वाधिक १३.७० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे बांधकाम व दुरुस्ती कामांसाठी विभाग प्रयत्न करत आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय अंगणवाडी केंद्र तालुकानिहाय निवड झालेल्या अंगणवाडी अक्कलकोट ११बार्शी १०करमाळा८माढा ९ माळशिरस १३,मोहोळ९ मंगळवेढा ८सोलापूर ४ पंढरपूर९सांगोला ११ दक्षिण सोलापूर ८
Good