Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह राजेंद्र राऊत करणार उपोषण

सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह राजेंद्र राऊत करणार उपोषण

मित्राला शेअर करा

सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे खासदार, आमदार हे गुरुवार दि. 13 मे 2021 रोजी सकाळी 11:30 वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

केंद्र शासन व राज्य शासनामार्फत रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सीजन पुरवठा व कोवीड लसींचा पुरवठा पुणे विभागातील जिल्ह्यांना केला जात आहे. दि.12 एप्रिल 2021 ते 10 मे 2021 या कालावधीमध्ये पुणे विभागासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन व कोवीड लस पुरवठा करताना पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यावर वितरणाबाबत अन्याय होत आहे. सोलापूर जिल्ह्याला रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसीवीर इंजेक्शन दिली जात नाहीत. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापी सुरळीत केला जात नाही. कोवीड लस ही लोकसंख्येच्या प्रमाणात दिली जात नाही. टेस्ट किटचा पुरवठा जिल्ह्याला कमी प्रमाणात केला जातो.

या उलट पुणे विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये ज्या जिल्ह्याचे मंत्री आहेत, त्या जिल्ह्यास ज्यादा प्रमाणात झुकते माप देऊन सोलापूर जिल्ह्याचाही कोठा विभागातील इतर जिल्ह्यांना दिला जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोवीड रुग्ण संख्या वाढत असून त्याचा परिणाम जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यू दरांमध्ये झालेला आहे. यापूर्वी वेळोवेळी आम्ही प्रशासनामधील संबंधित अधिकाऱ्यांना पाठपुरावा करूनही वरील बाबतीत कोणतीही पूर्तता केली जात नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हीं श्रीकांत दादा देशमुख जिल्हाध्यक्ष भाजपा, मा. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य,मा. खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री आमदार मा. सुभाष देशमुख, माजी मंत्री आमदार मा.विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे व भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील सर्वजण मिळून वरील बाबींची गांभीर्याने नोंद घेण्याकरिता गुरुवार दिनांक 13 मे रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

सदर उपोषणाबाबत आमदार राजेंद्र राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार, आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.राजेंद्र शिंगणे विधानसभा विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते मा. प्रवीणजी दरेकर, पालक मंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील, पुणे विभागीय आयुक्त मा. सौरभ राव, सोलापूर जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मा. तेजस्वी सातपुते यांना ई-मेल द्वारे पत्र पाठविले आहेत.