Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > सोलापूर पंढरपुर अकलूज मार्गे धावणार बुलेट ट्रेन

सोलापूर पंढरपुर अकलूज मार्गे धावणार बुलेट ट्रेन

मुंबई हैदराबाद दरम्यान धावणारी प्रस्तावित हायस्पीड बुलेट ट्रेन सोलापूरवरून जाणार आहे .
मित्राला शेअर करा

मुंबई हैदराबाद दरम्यान धावणारी प्रस्तावित हायस्पीड बुलेट ट्रेन सोलापूरवरून जाणार आहे . त्यासाठी सोलापूरात सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहेत्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या  प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल 


पुणे येथील मोनार्क सर्व्हेअर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट या कंपनी मार्फत  सर्वेक्षणाचे काम करण्यात येतआहे . सोलापूर व पंढरपुर या ठिकाणी प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे . या पथका मार्फत सोलापूरा व पंढरपूर येथे सर्वेक्षण केले जात आहे .
जीटीएस लेव्हल, जीपीएस सर्वेक्षण आणि ड्रोन सर्वेक्षण या सारख्या तांत्रिक बाबींचा यासर्वेक्षणात समावेश असतो.मुंंबई ते हैदराबाद ७११ किमीचे अंतर ही बुलेट ट्रेन अवघ्या साडे तीन तासात पार करणार आहे . सध्या हे अंतर पार करण्यासाठी १४ ते १५ तास लागतात .

सदर बुलेट ट्रेन कुर्ला कॉम्प्लेक्स , नवी मुंबई , लोणावळा , पुणे , कुरकूंभ  दौंड , अकलूज , पंढरपूर , सोलापूर , कलबुर्गी , जहिराबाद या मार्गावरून हैदराबाद येथे पोहचेल असे समजते .

भारत सरकारने आखलेल्या सहा नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमधील हा पाचवा कॉरिडॉर आहे .मुंबई ते हैदराबाद हे ७११ किमीचे अंतर ही बुलेट ट्रेन अवघ्या साडे तीन तासात पार करणार आहे . सध्या हे अंतर पार करण्यासाठी १४ ते १५ तास लागतात .ताशी 320 किमी पर्यंत वेगाने ही ट्रेन धावेल साध्या प्रचलित रेल्वेचा ताशी वेग 120 कीमी इतका आहे सर्वेक्षणाचे हे काम एका महिन्यातपूर्ण होणे अपेक्षित आहे या बुलेट ट्रेन चा फायदा जिल्ह्यातील व्यापारी उद्योग व्यावसायिकांना होणार आहे