उन्हाच्या कडाक्यामुळे राज्यातील पाणी संकट वाढू लागले असून छोटे-छोटे जलस्त्रोत अटू लागल्याने ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढू लागली आहे. तसेच धरणातील पाणीसाठ्यातही घट होऊ लागली आहे.
राज्यातील धरणांमध्ये ३८.६८ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून टंचाईग्रस्त भागात ४०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गुरूवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठय़ासाठी जलसाठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्याचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी बैठकीत दिली.
राज्यातील उपलब्ध जलसाठा
अमरावती : ४५ टक्के, मराठवाडा : ४५ टक्के, कोकण : ४४ टक्के, नागपूर : ३५ टक्के, नाशिक : ३५ टक्के, पुणे : २८ टक्के
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात मागील काही वर्षांपासून चांगला पाऊस झाला त्यामुळे उन्हाळ्यात मायनस साठा असणारे उजनी प्लस मध्ये राहिले आहे. लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे त्यामुळे उजनी वर अवलंबून असणारे सोलापूर, बारामती, इंदापूर, पुणे, या भागात साध्या तरी बरी परिस्थिती आहे.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन