श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित महात्मा फुले विद्यामंदिर बार्शीच्या इयत्ता दुसरीच्या एकाच तुकडीतील 4 विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षेच्या राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून घवघवीत यश मिळवलेले आहे.

यामध्ये रुद्र नितीन शिंदे 142 गुण मिळवून राज्यात 5 वा, सर्वज्ञ शिरीषकुमार साळुंके 136 गुण मिळवून राज्यात 8 वा, मयुरेश मिलिंद विटकर 134 गुण मिळवून राज्यात 9वा, शिवाय निचिकेत गोंदील 132 गुण मिळवून राज्यात 10 वा आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री. विजय विश्वजीत भानवसे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष श्री. नंदनकुमार जगदाळे, खजिनदार श्री. जयकुमार शितोळे, जनरल सेक्रेटरी श्री. पी. टी पाटील, श्री. अरुण देबडवार, श्री. व्ही. एस. पाटील, श्री. जी. एम. पाटील, श्री. एस के मोरे, श्री. दिलीप रेवडकर, श्री. शशिकांत धोत्रे, मुख्याध्यापिका श्रीम एम डी पवार, डॉ. डी. पी. गुंड, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक वर्ग व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
महाराष्ट्र ढोल पथक महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रमुख शिलेदारपदी श्रीकांत जिठ्ठा आणि प्रविण परदेशी यांची निवड