बार्शी : स्व.सुशिल व शितल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या दहा वर्षांपासून स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या ही वर्षी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे अकरावे वर्ष असल्या कारणाने हे वर्ष रक्तदात्यांचा सेवाभाव जपण्यासाठी समर्पित करण्यात आले होते.यामध्ये रक्तदात्यांना विविध पद्धतीने सेवा देण्याचे काम करण्यात आले.या रक्तदान शिबिराची तयारी गेल्या एक महिन्यापासून सुरू होती.या रक्तदान शिबिरामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व व्यापारी तसेच विद्यार्थी,महिला व इतर सर्व स्तरातील रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ४४८ रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली वाहिली.

या राऊत बंधूंचे २०१२ साली अपघाती निधन झाले पण त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींशी असलेले नातेसंबंध व त्यांनी जोडलेली नाळ टिकवण्याचं काम मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षापासून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे.या रक्तदान शिबिरात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते सहभागी होत आहेत गेल्या दहा वर्षात या रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदान होते.यावर्षी ४४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांच्या उदंड प्रतिसादामुळे रक्तदान शिबिर रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.यामध्ये २३ महिलांनी तसेच एकत्रित ४ जोडप्यांनी, ५ डॉक्टरांनी,बार्शी शहर व ग्रामीण मधील ४ पोलीस बांधवांनी, बार्शी वकील संघातील ९ वकील बांधवांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी जय शिवराय प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेतले जात होते.या रक्तदान शिबिरास प्रतिष्ठित मान्यवरांनी देखील भेटी दिल्या यामध्ये आमदार राजेंद्र राऊत,नगराध्यक्ष असिफ तांबोळी,डॉ.संजय अंधारे,महेश जगताप,स्मार्ट अकॅडमी चे सचिन वायकुळे, जाणीव फाउंडेशन, वृक्षसंवर्धन समिती,ओन्ली समाजसेवा ग्रुप, सह्याद्री प्रतिष्ठान, मेडिकल असोसिएशन सदस्य यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले.त्याच बरोबर डॉ.बी.वाय.यादव साहेब,श्री विजय राऊत,श्री रणवीर राऊत,संतोष बारंगुळे,संदेश काकडे,मदन गव्हाणे,त्याचबरोबर प्रतिष्ठित व्यापारी,पत्रकार बांधव व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.
या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम किरण राऊत,राजेश राऊत, रावसाहेब यादव,राजन ठक्कर, सचिन ललवाणी,सुनिल ललवाणी,संजय राऊत,सुधिर राऊत,विजय राऊत,मनोज मोरे,सुमित नाकटिळक,कृष्णा परबत,अमित नागोडे,अमोल वाणी,आकाश तावडे,विकास पौळ,अविनाश वैदय,माधव जाधव,अजित पाटील,अनिल शेलार,गणेश वाणी,विक्रम राऊत,डॉ राहुल शेळके,आदित्य परबत,सूरज वाणी,गणेश पन्हाळकर,सुनिल शेलार,विनीत नागोडे,सुहास गुंड,संकेत वाणी,राहुल वडेकर,वैभव विधाते,दयानंद शिंदे,कृष्णा शिंदे अक्षय अंबुरे,किरण नान्नजकर,गणेश हांडे, सतिश राऊत,निखिल गरड,नागराज सातव,संदेश भोंडे,राहुल जाधव,अमित चव्हाण,सुबोध पाटील,अंबुऋषी गायकवाड त्याच बरोबर भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे,गणेश जगदाळे,अशपाक काझी या सर्वांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन व नियोजन करण्यात आले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ