Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थ्यांनी मानसी सुहास काळे हिची जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे निवड

महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थ्यांनी मानसी सुहास काळे हिची जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे निवड

महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थ्यांनी मानसी सुहास काळे हिची जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे निवड
मित्राला शेअर करा

सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर 2023 च्या भारतातील सर्वोत्कृष्ट कॉलेजेसमधील टॉप 10 आर्किटेक्चर कॉलेजेसमध्ये 4 व्या स्थानावर आहे. सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर 10 शासकीय महाविद्यालयांमध्ये द्वितीय स्थानावर आहे.

सर जेजे स्कूल ऑफ आर्टची स्थापना 1857 मध्ये बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री म्हणून करण्यात आली, सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या दूरदृष्टी आणि दानशूरतेमुळे 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात, स्थापत्यशास्त्राचे शिक्षण एका कला शिक्षणासह एकत्रित केले गेले ज्याने मूर्तिकला अलंकार आणि वास्तू तपशीलवार ब्यूक्स आर्ट्स स्कूलचे अनुसरण करत या कॉलेजची स्थापन करण्यात आली.

सर जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट ही मुंबईतील भारतीय उपयोजित कला संस्था आहे . हे एक राज्य सरकारी महाविद्यालय आहे सर जेजे स्कूल ऑफ आर्टच्या माध्यमातून सुरू झाले . नावातील “सर जेजे” म्हणजे सर जमशेटजी जीजेभॉय , पारशी समाजसेवी, ज्यांचे नाव सर जेजे रुग्णालयासारख्या मुंबईतील असंख्य ऐतिहासिक संस्थांशी जोडलेले आहे . भारतीय डिझाईन आणि जाहिरातींच्या वारशासाठी तसेच ऐतिहासिक परिसरासाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.

सर जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट

1958 मध्ये, सर जेजे स्कूल ऑफ आर्टची विभागणी करण्यात आली, ज्यामध्ये आर्किटेक्चर आणि अप्लाइड आर्ट विभाग अनुक्रमे सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि सर जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट बनले.

या महाविद्यालयातून
नाना पाटेकर – भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता

राज ठाकरे – राजकारणी आणि समाजसेवक

उद्धव ठाकरे – महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री, राजकारणी

शिवकर बापूजी तळपदे – 1895 मध्ये मानवरहित विमान उडवणारे ते पहिले भारतीय आहेत.

तेजल पाटणी – फॅशन फोटोग्राफर

ब्रेंडन परेरा , पुरस्कार विजेते क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि डिझायनर

सुनील पडवळ – प्रसिद्ध भारतीय चित्रकार

असे अनेक नामवंत कलाकार आणि चित्रकार तयार झाले.

शालेय शिक्षणानंतर पुढे मानसी काळे यांनी सोलापूर येथील पुष्कराज गोंरंटाला यांच्या लिओनार्डो कला अकॅडमी
(Leonardo…
Leonardo Art Academy Solapur येथे पुढील मार्गदर्शन घेतले.

घरच्यांचा प्रोत्साहन दिल्यामुळेच मानसी सुहास काळे हिने एक वेगळे क्षेत्र निवडून उज्वल यश संपादन केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अगदी सामान्य कुटुंबातील मानसी हिने कुटुंबात कुठलीही कलेची पार्श्वभूमी नसताना आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून मानसी काळे हिचे वडील सुहास काळे बाहुबली मेडिकल स्टोअर चालवतात, काका उमेश काळे M.R आहेत तसेच वृक्ष संवर्धन समितीच्या स्थापनेमधे त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर काका गणेश काळे हे ही मेडिकल स्टोअर चालवतात.

मानसी काळे हिचा महाराष्ट्र विद्यालयाच्या वतीनेही सत्कार करण्यात आला यावेळी जेष्ठ काला शिक्षक श्री. लांडगे एस. एम, श्री मोहिते एन. ए. श्रीमती शिंदे एस. एल. श्रीमती झाडे के. एस. पवन जगदाळे उपस्थित होते.