जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याती वर्डी शिवारात हेलिकॉप्टर दुर्घटना झाली. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.तर महिला पायलट गंभीर जखमी आहे.
चोपडा तालुक्यातील वर्डी शिवार असलेला भाव हा आदिवासी परिसर आहे. सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या राम तलाव परिसरात दुर्घटना दुपारी चारच्या सुमारास झाली आहे.दुर्घटना झालेले प्रशिक्षणार्थींचे छोटे विमान आहे ही
दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून महिला पायलट गंभीर जखमी आहे.आदिवासी परिसर असल्याने येथील आदिवासी बांधवांनी जखमी महिला पायलटला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेले.चोपडा तहसिलदार व नायब तहसिलदार घटनास्थळी पोहचत आहेत.
सदर घटना घडली हा परिसर सातपुडा पर्वत रांगेत असून, घनदाट जंगलाचा परिसर आहे. घटनास्थळी पोहचण्यासाठी तीन किलोमीटर पायी जावे लागत असल्याने प्रशासनाची देखील तात्काळ मदत मिळणे कठीण आहे.
More Stories
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर