सांगली,कोल्हापूर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे.झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उन्मळून पडले आहेत.अशा पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत We Maratha संघटनेने पुढाकार कार घेतला आहे.तत्परतेने मदत गोळा करून गुरुवारी ( ता .५ ऑगस्ट रोजी ) महाडच्या दिशेने मदतीचा टेम्पो पाठविण्यात आला We Maratha ही संघटना महाराष्ट्रभर काम करते,आम्ही समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेने निस्वार्थपणे समाजाच्या हितासाठी एकवटलेल्या ध्येयवेड्या मराठा तरुणांचा हा समुह आहे.गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून या टीमने मोलाची कामगिरी पार पाडली आहे.
सांगली,कोल्हापूर आणि कोकणातील काही जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे We Maratha या संघट ने ने पूरग्रस्तांना मदत म्हणून सर्व टीम ने व्हाट्स अप व फेसबुक या सोशल मीडियावर मदतीसाठी आवाहन केले होते.यात संभाजीनगर,अहमदनगर व पुण्याहून भरपूर मोठ्या प्रमाणात मदत जमा करण्यात आली.आलेली मदत किट स्वरुपात बनवून तिचे वाटप येत्या शुक्रवारी म्हणजेच सहा तारखेला We Maratha टीम तर्फे गरजूंना वाटप करण्यात येणार आहे. ही मदत जमा करण्यासाठी थश चरीरीहर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध शिवाजी शेलार,अध्यक्षा सौ,स्नेहलताई कदम पाटील,राज्यप्रमुख मयूर पाचोरे,सोशल मीडिया प्रमुख सुधीर सोनवणे,संदीप निर्मल,धनंजय निंबाळकर,माऊली इंगळे,संघटनेचे मराठवाडा विभाग प्रमुख अंगद भिंगारे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष ऋषिकेश मोहिते,जिल्हा उपाध्यक्ष समाधान नवले,मयूर श्रिखंडे,शिवम भुसारे, दादासाहेब आव्हाळे, ऋषिकेश राऊत, अहमदनगर जिल्हा प्रमुख अक्षय आमटे,पाथर्डी तालुका प्रमुख रोहीत वाबळे,प्रशांत आमटे , सोमनाथ ढमाळ,सचिन देवढे,रवि आमटे,उध्दव ताठे,नितीन ताठे,राजेंद्र कदम,वाघाडे सर,अभय आमटे,अमित धावडे,सागर वाघ,विनायक पाटील आदींनी परिश्रम घेतले.
या सर्व टीमचे प्रशांत संभाजीराव जाधव सोलापूर जिल्हा ऍडमिन यांनी आभार मानले.
तसेच ज्या बांधवाना we maratha संघटने मध्ये सामील व्हायचे आहे त्यांनी 9112033009 या no वर whats aap ला संपर्क करण्याचे आवाहन केले.
More Stories
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान