डाॅ.सतीश कदम हे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर या ठिकाणी प्राध्यापक (इतिहास विभाग प्रमुख) म्हणून कार्यरत आहेत तसेच महाराष्ट्र राज्य इतिहास परिषदेचे अध्यक्ष आहेत. कदम सर यांना हैदराबाद मुक्ती संग्रामातील क्रांतीकारकाच्या संशोधनात्मक अभ्यासासाठी राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा यंदाचा “दुर्गमहर्षी प्रमोद मांडे क्रांती पाईकी पुरस्कार” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आल.
ते मूळचे उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या गावातील असून प्राध्यापक कदम यांनी नवोदय विद्यालय समितीचे सदस्य म्हणून ही काम पाहिले आहे.
त्यांनी तेर (उस्मानाबाद) येथे ही संशोधन केले असून ज्यामध्ये आंतर-सातवाहन काळ थेट युरोपियन लोकांचा पुरावा आहे, मूळचा रोमबरोबरचा स्थानिक व्यापार होता. “मध्य युगातील औसा किल्ला.1504 मध्ये,काहिम बरीद, बहामनी किल्ल्याचा किल्लेदार नंतर बिदरचा राजवंश बनला.” नगरच्या सिंहासनावर बहमनी निजामाचा सुल्तान 1602 मध्ये काही दिवस औसा किल्ल्यात राहिला.त्यानंतर औसा जिंकल्यावर मलिक अंबरचे नाव बदलून अंबरपूर असे करण्यात आले या संदर्भात देखील सविस्तर संशोधन जगासमोर आणले आहे
उदगीर किल्ल्यावर शहाजहानचे वर्चस्व होते. 1635 चा एक शिलालेख या संदर्भात देखील लिखाण केले आहे
निजाम आणि बाजीराव पेशवे यांच्या ऐतिहासिक बैठक या संदर्भात देखील सविस्तर संशोधन केले आहे.
चेन्नईतील काली मंदिरात शिवरायांचा शिलालेख…
छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर असताना त्यांनी ३ आक्टोंबर १६७७ रोजी चेन्नईमधील काली कांब मंदिरात जाऊन देवीची पूजा करून बांधकामाची मुहूर्तमेढ रोवली.अगदी दोन दिवस महाराजांनी तेथे थांबून देवीच्या भक्तीचा अस्वाध घेतला.पुढे महाराजापासून प्रेरणा घेऊन तामिळीनी स्वातंत्र्याचा लढा उभा केला. राजांची आठवण म्हणून अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारावर तिथल्या लोकांनी त्यांचा फोटो लाऊन एका दगडावर शिलालेख कोरुन शिवाजीमहाराज आल्याची नोंद करून ठेवली आहे.देवी मंदिरात प्रवेश करताच डाव्या बाजुच्या भिंतीवर राजांचा चारएक फूट उंचीचा पुर्णाकृती फोटो असुन दुसऱ्या एका फोटोत महाराजांना काली कांब देवी भवानी तलवार देताना दाखवली आहे.तामिळींना राजांचे चरिञ चांगलेच माहित असून त्यांच्याविषयी खुप अभिमान असल्याचे चर्चेतून जाणवले.चेन्नई रेल्वे स्थानकापासून काली कांबा मंदिर अगदी जवळ आहे.चेन्नईमध्ये अनेक मराठी घराणी असून त्यांनी 'मद्रास मराठा संघम'नावाची संघटना स्थापन करून त्यांच्याकडून १९ फेब्रुवारीला फार मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते.त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठही गेलेतरी राजे हे राजेच होते याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. चेन्नईत नरसिंगराव कदम हे याकामी पुढाकार घेऊन काम करत आहेत.श्रीलंकेतून परत येताना हा सहज शोध घेतला.(२५ ऑगष्ट २०१३) व छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणण्याचे काम प्रा.डॉ.सतीश कदम यांनी केले.
प्रा.कदम हे गाळीव इतिहास या YouTube युट्यूब चॅनेल च्या माध्यमातुन आपले संशोधन जगासमोर मांडत आहेत.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न