बार्शी, तालुक्यात झालेल्या अति पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू नाहीत ते तात्काळ सुरू करण्याची मागणी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर याना समक्ष भेटुन केली असता जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार याना याबत आदेश दिले आहेत.
माझी मंत्री दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन बार्शी तालुक्यात झालेल्या नुकसानी बाबत चर्चा केली यावेळी प्रांत अधिकारी हेमंत निकम बार्शी न.पा. विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे उपस्थित होते
अति पावसामुळे बार्शी तालुक्यातील शेतातील उभ्या पिकाबरोबर काढून ठेवलेले धान तसेच शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे , नदी ओढे लगत च्या जमिनीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे शेतकरी अति पावसा च्या या संकटाने उध्वस्त झालेला आहे.
शासकीय पातळीवरून झालेल्या नुकसानी बाबत कोणत्याही दिलासादायक हालचाली नसल्याने नुकसानग्रस्त भयभीत आणि चिंताग्रस्त आहेत त्यामुळे शासकीय यंत्रणांना पंचनाम्यासाठी आदेशीत करण्याची मागणी सोपल यांनी केली.
यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रांत अधिकारी निकम आणि तहसीलदार सुनील शेरखाने यांना तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले.
More Stories
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान