कोविड मुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते.
अलीकडील काळात प्रभावी उपचार पद्धती व लसीकरण मोहीम यामुळे रुग्णसंख्या नगण्य झाली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करत महाराष्ट्र शासनाने 8 वी ते 12 वी चे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार आज ०४/१०/२१ वार सोमवार रोजी बार्शीतील महाराष्ट्र विद्यालय या शाळेत शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत आज प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेला सुरवात झाली अणि विद्यार्थ्यांच्या भाषेत अखेर शाळा भरली
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्री.जयकुमार शितोळे (खजिनदार श्री शि.शि.प्र. मं.बार्शी) प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री.पी.टी.पाटील तसेच प्रशालेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे श्री.अनिल बनसोडे( प्रशासनअधिकारी न.पा.बार्शी) व श्री.संजय पाटील (पर्यवेक्षक शि.वि.न.पा.बार्शी)श्री.दत्ता सुरवसे (पत्रकार) श्री.धीरज शेळके (पत्रकार)यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य जी.ए चव्हाण यांनी केले,प्रा.किरण गाढवे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच पुस्तकांचे वाटप करण्यात आले.कोविड संदर्भात घ्यावयाची काळजी यासंदर्भातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
या कार्यक्रमात पुढे संस्थेचे सचिव पी.टी.पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे,अनिल बनसोडे ,संजय पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कसबे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मदने सर यांनी केले.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न