पंतप्रधान ठिबक सिंचन योजना 2015 मध्ये सुरु करण्यात आली आहे, मात्र यामध्ये आता काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
या योजनेमध्ये आता 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ 2025-26 पर्यंत घेता येणार आहे – तसेच केंद्र सरकारने या योजनेकरिता 50 हजार कोटींची तरतूद देखील केली आहे.
तसेच सिंचनासाठी जर स्प्रिंकलरचा वापर केला तर 80 ते 90 टक्के अनुदानही शेतकऱ्यांना मिळणार आहे.
योजनेचा लाभ कोणाला घेता येतो
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमिन असणे आवश्यक आहे – तसेच शेतकरी या योजनेचा लाभ वैयक्तिक तर घेता येणारच,याव्यतिरिक्त शेती गट, संस्था, सहकारी संस्था.
तसेच कॉर्पोरेट कंपन्या, शेती उत्पादक कंपन्यांच्या गटांचे सदस्य आणि इतर पात्र संस्थांचे सदस्य यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या व्यतिरिक्त या योजनेचा फायदा अशा शेतकऱ्यांनाही घेता येणार आहे जे गेल्या सात वर्षांपासून भाडेपट्टी करारांतर्गत शेतजमिन करत आहेत.
आवश्यक कागदपत्रे
• ७/१२ प्रमाणपत्र
• ८- ए प्रमाणपत्र
• वीज बिल
• खरेदी केलेल्या संचाचे बिल
• पूर्वसंमती पत्र
अर्ज कुठं करायचा
▪️ अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल ओपन करा, त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे
▪️ यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरा, नंतर सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडा – त्यांनतर ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती भरा
▪️ सेव्ह बटनावर क्लिक करा, नंतर अर्ज सादर करा या पर्याया वर क्लिक करा – त्यानंतर तालुका हे ऑप्शन दिसेल तसेच आपण ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल
यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून 23 रुपये 60 पैसाचे पेमेंट करावे लागणार आहे
पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेमध्ये – मुदतवाढ झाली हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.
More Stories
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न