अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दि. ०५/०८/२०११ पासुन लागु करण्यात आला आहे. सदर कायदयाचा प्रमुख उद्देशाने जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपल्ब्ध करुन देणे हा आहे.
अनेकदा लोकांमार्फत बाहेरुन नाष्टा मागविला जातो त्यावेळी अन्न व्यवसायिक हे वडापाव , पोहे या सारखे अन्न पदार्थ सर्रास न्युजपेपरमध्ये बांधुन देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासुन बनविलेली असते ( डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल ) या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी केला जातो. अशा न्युजपेपरमध्ये गरम खादयपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक ठरत आहे . त्यामुळे भारतीय खादय सुरक्षा मानके प्राधिकरण ( FSSAI ) भारत सरकार यांनी दि ०६/१२/२०१६ आदेश निर्गमित केले आहेत.
यामध्ये सर्व अन्न व्यवसायिक छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेते यांना सुचित करण्यात आले आहे की, न्युजपेपरमध्ये अन्न पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल. असे अन्न व औषध प्रशासन ( म.रा ) पुणे विभाग सह आयुक्त् ( अन्न ) शी. म. देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
More Stories
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान