Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > के. एन. भिसे महाविद्यालयात ‘माहितीचा अधिकार आणि शासन निर्णय’ यावर प्रशासकीय कार्यशाळेचे आयोजन

के. एन. भिसे महाविद्यालयात ‘माहितीचा अधिकार आणि शासन निर्णय’ यावर प्रशासकीय कार्यशाळेचे आयोजन

के.एन. भिसे आर्टस, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी. मार्फत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पू. अ. होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांनी भूषवले. महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शैक्षणिक आणि प्रशासकीय कामे समांतर गतीने चालली पाहिजेत असे प्रतिपादन डॉ शिंदे यांनी केले.
मित्राला शेअर करा

दि. 12-02-2022.
माहितीचा अधिकाराच्या उगमापासून ते त्याचा विधायक वापर कसा केला पाहिजे यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. शासन निर्णयाचे योग्य आकलन करून महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजामध्ये त्याचा कसा वापर केला पाहिजे हे देखील त्यांनी त्याच्या ओघवत्या शैलीमध्ये सांगितले. शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी शासन निर्णयाची योग्य माहीत सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना असली पाहिजे असे आग्रही मत त्यांनी मांडले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ.आर. आर. पाटील यांनी आपल्या प्रशासकीय अनुभवाच्या माध्यमातून शासन निर्णय कसे समजून घेतले पाहिजेत व त्याचा योग्य वापर महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी कसा केला पाहिजे यावर भाष्य केले. तसेच त्यांनी आशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना खूप फायदेशीर असतात व त्याचा त्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये उपयोग करून घेतला पाहिजे असे मत मांडले. कार्यक्रमाच्या सुरवातीला आय.क्यू.ए. सी. समन्वयक डॉ.सचिन लोंढे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यशाळा आयोजनाबाबतचा हेतू स्पष्ट केला.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. एस. पी. फुलवळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ए. एच. कदम यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.