सोलापूर, दि.21 :- राज्य शासनाकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय (सिव्हील) येथे 27 ते 29 सप्टेंबर 2022 अखेर सेवा पंधरवडा शिबीर आयोजित केले आहे. 10 सप्टेंबरपूर्वी कागदपत्रे तपासणी केलेल्या दिव्यांगांनी प्रलंबित प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी उपस्थित राहून सेवा पंधरवड्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
सिव्हीलमधील दिव्यांग खिडकी येथे 10 सप्टेंबर 2022 पूर्वी नोंदणी करून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी सर्व कागदपत्रे तपासणी केलेली आवश्यक आहे. इतर प्रक्रिया, तज्ज्ञाकडून तपासणी, चाचण्या आणि मूळ कागदपत्रे जमा न केलेले या कारणामुळे प्रलंबित असलेले दिव्यांग लाभार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. हे शिबीर सिव्हीलमधील त्या-त्या विभागात होणार आहे.
नाक-कान-घसा, अस्थिव्यंगोपचार, मनोविकृती, नेत्रशल्यचिकित्सा, बालरोग, शल्यचिकित्साशास्त्र आणि औषधवैद्यकशास्त्र या विभागात दिव्यांगांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सेवा पंधरवडा शिबीर आयोजित केल्याची माहिती डॉ. वैश्यंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.
More Stories
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान