मुंबई : ” महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे . त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील व लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल ” असे विधान मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी केले. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते .
अस्लम शेख यांनी , “ गेल्या आठवड्यापासून आपण मीटिंग घेऊन सगळे विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेत आहोत . टास्क फोर्सशी चर्चा झाली . आपण लोकांचीही मतं जाणून घेत आहोत . ब्रेक द चेन यानुसार आज निर्णय होईल . लॉकडाऊन करणे गरजेचं आहे .राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त टेस्ट झाल्या आहेत . त्यामुळे केस जास्त आहेत . साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणार आहे . त्याबाबत नियमावली आज जाहीर होणार आहे .
परप्रांतियांना आपण घरी जाण्यासाठी अडवत नाही , असंही अस्लम शेख यांनी सांगितलं . महाराष्ट्रात लॉकडाऊन १२ ते १३ दिवसांचा असू शकतो , असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले . राज्यातल्या परप्रांतिय कामगारांनी महाराष्ट्र सोडू नका असे आवाहन त्यांनी केले.
तुमची सगळी काळजी राज्य सरकारकडून घेतली जाईल . महाविकास आघाडी सरकार आणि कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र तुमची काळजी घेईल याच आश्वासन देतो , असं मुश्रीफ म्हणाले . परप्रांतिय नागरिकांनी गर्दी करून रेल्वे स्टेशन , बस स्थानकांवर गर्दी करू नये . महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे . लॉकडाऊन 12 ते 13 दिवसांचा असू शकतो , असं, मुश्रीफांनी सांगितलं .
लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदीपासून इतर कडक निर्बंध असतील . लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी अंमलबजावणी होणार आहे . लोकांना तयारी करण्यासाठी वेळ दिला जाईल , अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वजेट्टीवार यांनी दिली .
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरूआहेत. चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरु होणार असेही ते म्हणाले . राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज आहे असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलंय . मात्र , याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय . राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ , असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे . तसंच सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीय . राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल .
तज्ज्ञांच्या मते १४ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे . तज्ज्ञांच्या मताला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिलाय . मात्र , मुख्यमंत्री किमान ८ दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत . ८ दिवसानंतर एक एक गोष्ट हळू हळू सुरु करु , अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे .
More Stories
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान