बार्शी शहरातील बार्शी वकील संघाच्या गुरुवारी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अविनाश जाधव १०९ मते मिळवून तर सचिवपदी राजकुमार गुंड १४६ मते घेत विजयी झाले आहेत. सर्व विजयी उमेदवारांचे सर्व वरिष्ठ वकील व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
बार्शी वकील संघाच्या झालेल्या निवडणुकीत २९४ सदस्यांपैकी २८२ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवार घोषित करण्यात आले.
ॲड. अविनाश जाधव यांची वकील संघाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड
अध्यक्षपदासाठी चार जणांमध्ये झालेल्या निवडणुकीत अविनाश जाधव यांना १०९ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन शेटे यांना ९५ मते, काकासाहेब गुंड यांना ७४ मते तर संजयकुमार गुंड यांना ३ मते मिळाली.
उपाध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीमध्ये शंकर ननवरे यांना ११२ मते मिळून विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धा सोमनाथ काशीद यांना ११० मते तर अजय भुसारे यांना ५७ मते मिळाली.
सचिवपदाच्या निवडणुकीत राजकुमार गुंड १४६ मते घेऊन विजयी झाले तर त्यांच्या प्रतिस्पर्धी वृशाली वाघमारे यांना ५८, इक्बाल पठाण ४३ मते, धीरज कांबळे यांना २७ मते मिळाली. खजिनदार पदाच्या झालेल्या निवडणुकीत कैलास बड १३५ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी मुजाहिद तांबोळी यांना १३४ मते मिळाली.
लायब्ररी चेअरमनपदासाठी झालेल्या निवडणुकीत अविनाश गायकवाड १२७ मते घेऊन विजयी झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी अक्षय रानमाळ यांना १२२ मते मिळाली.
वकील संघाची व्यवस्थापन समितीमध्ये जगन्नाथ कोरके-पाटील, आर. यु. वैद्य, प्रविण करंजकर, प्रविणा पाटील यांची बिनविरोध निवड
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिनेश देशमुख, किशोर करडे, आनंद ठोकडे यांनी काम पाहिले.
More Stories
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख