भारतीय विज्ञान काँग्रेसच्या आयोजनानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील प्राचिन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग, केंद्र शासनाचा पुरातत्व सर्वेक्षण व उत्खनन विभागाच्यावतीने विद्यापिठाच्या आवारात ‘समृध्द भारतीय वारसा’ या विषयावर प्रदर्शन उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॅा.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते झाले.
कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र.कुलगुरु डॉ. संजय दुधे, अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ. प्रिती त्रिवेदी आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. डॉ.सिंह यांनी त्याचे फित कापून उद्घाटन केले.
विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच देशाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव, देशातील तसेच विशेषत: विदर्भातील पुरातत्व उत्खनन आणि वास्तुकला वारसा दर्शविणाऱ्या या प्रदर्शनाची राज्यमंत्री डॉ. सिंह यांनी पाहणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेल्या चित्रांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ. त्रिवेदी यांनी विषद केले. विभागाच्या प्राचीन वस्तू संग्रहालयाची देखील त्यांनी पाहणी केली.
तक्षशिला, हडपसर, ब्रम्हगिरी, कालीगंगा येथील उत्खननासह नागपूर जिल्ह्यातील अडम व मनसर तर भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील उत्खनन व तेथे आढळून आलेल्या वस्तूंची चित्रे या प्रदर्शनात आहेत. मानवाची उत्पत्ती, प्राचीन काळातील अवजारे, सातपुडा पर्वतातील गाविलगडच्या डोंगरांमधील कोरीव काम, नागपूर शहरातील वास्तूशास्त्रीय वारसा स्थळे, गोंडकालिन किल्ल्यांची चित्रे व माहिती या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे.
More Stories
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान