हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे बार्शी शहरांमध्ये सकाळी जुलूस काढण्यात आला शहरातील सर्व मुस्लिम बांधव लहान मुले मुली जेष्ठ नागरिक सर्व मशिदीचे मौलाना, रिक्षा मोटरसायकल ची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी खाऊ वाटप करण्यात आला. आमदार राजेंद्र राऊत, माजी मंञी दिलीप सोपल, माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, नागेश अक्कलकोटे, कृष्णराज बारबोले,शंकर देवकर यांच्या हस्ते खाऊ वाटप झाले.

शहरातील प्रमुख मार्गाने शाहीर अमर शेख एसटी स्टँड चौक तेलगिरणी चौक ऐनापुर मारुती रोड कसबा पेठ पांडे चौक इत्यादी मार्गाने मिरवणूक जात असताना ठीक ठिकाणी लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले शेवटी मदिना मस्जिद जुलूस कमिटी च्या वतीने सांगता समारंभ करण्यात आला यावेळी मौलाना अन्वरुल हक यांच्या हस्ते डीवायएसपी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक सःतोष गिरीगोसावी , एपीआय ज्ञानेश्वर उदार आदि अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आदम तांबोळी अबू खाजा शे ख जहीरोद्दीन आतार, मोशिन तांबोळी, राजू सय्यद ,हाजी वहाब पिंजारी इत्यादी समाज बांधव व्यासपीठावर उपस्थित होते .
गणेश विसर्जन व पैगंबर जयंती एकाच दिवशी आल्यामुळे मुस्लिम बांधवांनी एक दिवस उशिरा मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता राष्ट्रीय एकात्मता बंधुता बंधुभाव जपण्याचा मानस शांतता राखण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
कोशिश फाउंडेशनने मिरवणुकी नतंर स्वच्छता ठेवण्याचे काम गेली दहा वर्ष त्यांनी करत आहे त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक वाहिदभाई शेख यांनी केली.
More Stories
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award