बार्शी – इंटरनॅशनल ट्रायथलॉन आयर्नमॅन स्पर्धा ८ आक्टोंबर रोजी गोव्याची राजधानी पणजी येथे होत असून, ३० देशातील १६०० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. गोव्यात थरार अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेत बार्शीतील तिघांचा सहभाग असणार आहे. मॉर्निक रनअप आणि सायकलिंगच्या सातत्यपूर्ण सरावाने त्यांनी गोव्यातील या स्पर्धेत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे, या स्पर्धेतील त्यांच्या प्रदर्शनाकडे बार्शीकरांचे लक्ष लागले आहे.
जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या स्पर्धेपैकी एक असलेली ही स्पर्धा आहे. मिरामार येथे स्पर्धेचा प्रारंभ होणार असून, यात १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकल चालवणे आणि २१.१ किमी धावणे यांचा समावेश आहे. आयर्नमॅन स्पर्धा जगातील एक प्रसिद्ध स्पर्धा असून, स्पर्धक दोन वर्षापासून या स्पर्धेसाठी तयारी करत असतात. आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेचे ११३ किमी अंतर ८ तास आणि ३० मिनिटात पूर्ण करण्याचे आवाहन स्पर्धकांसमोर असते.
सदर स्पर्धेसाठी बार्शीतून बार्शी रनर व बार्शी सायकलिंग क्लबचे सदस्य महावीर कदम, मनोज बारबोले, अजित मिरगणे हे गोवा येथे दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी रणजीत पाटील हेही आहेत. त्यांनी सदर स्पर्धेसाठी पूर्वतयारीमध्ये मेहनत केली आहे. या स्पर्धेत यशस्वी होऊन बार्शीतील इतिहासात प्रथम आयर्न मॅन होण्याचा किताब पटकावण्यासाठी बार्शीकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, बार्शी रनर असोसिएशन, बार्शी सायकलिंग क्लब, मॉर्निंग क्लब बार्शी यांनी त्यांचे अभिनंदनही केलं आहे
More Stories
राज्यस्तरीय सीनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धेत कु. नेहा घाडगे तृतीय
श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या दिशा परदेशी हिची विद्यापीठ संघात निवड
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप