राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाला मताधिकार जागृतीची जोड देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून त्यानुसार या वर्षी नवरात्रीमध्ये जागर मताधिकराचा या कार्यक्रमात महिला मतदारांमध्ये विशेष जागृती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी दिली आहे.
मताधिकाराने लोकशाही बळकट करु या ! या उक्ती नुसार आता सुरु होणा-या दुर्गामातेच्या नवरात्रोत्सवामध्ये आगामी लोकसभा निवडणूकीआधीचा असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नव मतदारांची नोंदणी जास्तीत जास्त करुया तसेच नवरात्रोत्सव हा महिलांचा अत्यंत आनंदोत्सव आहे, नवरात्रोत्सवामध्ये महिलांचा सहभाग मोठया प्रमाणांत असतो त्याचा उपयोग करुन आपण महिला मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी करुन मतदार यादीतील स्त्री / पुरुष प्रमाण सुधारुन नारी शक्तीचा सन्मान करुया.
पोलिस आयुक्त, सोलापूर यांनी दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता नवरात्रोत्सवा निमित्त शांतता समितीची बैठकीचे आयोजन केले होते. सदर शांतता समितीचे बैठकीमध्ये नवरात्रोत्सव मंडळांना नव मतदार नोंदणीची आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र १ सदाशिव पडदूने यांचे वतीने करण्यांत आले.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नमुन्यातील २ बॅनर नवरात्र काळात त्यांचे मंडळाचे मंडपामध्ये दर्शनी भागात लावावेत व मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी असेही अवाहन श्री. पडदूने यांनी केले. मंडळांनी नव मतदार नोंदणी तसेच प्राथम्याने महिलांची मतदार नोंदणी करुन घेणेचे आवाहन केले.
नव मतदार नोंदणीसाठी मंडळांना कॅम्पचे आयोजनासाठी नमुना 6 चे फॉर्म तहसिल कार्यालयामार्फत पुरविण्यांत येतील तसेच फॉर्म भरणेसाठी मार्गदर्शन करणेसाठी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ( BLO ) पर्यवेक्षक उपलब्ध करुन देणेत येतील. कॅम्पचे आयोजनासाठी श्री सुधाकर तुकाराम बंडगर, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.
More Stories
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन