Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शी रेडक्रॉसचा तालुक्यातील रुग्णांसाठी फिरता दवाखाना सुरु, रुग्णांना मिळणार मोफत औषधोपचार

बार्शी रेडक्रॉसचा तालुक्यातील रुग्णांसाठी फिरता दवाखाना सुरु, रुग्णांना मिळणार मोफत औषधोपचार

बार्शी रेडक्रॉसचा तालुक्यातील रुग्णांसाठी फिरता दवाखाना सुरु, रुग्णांना मिळणार मोफत औषधोपचार
मित्राला शेअर करा

बार्शी:- बार्शी रेड क्रॉस सोसायटीत मोबाईल हेल्थ व्हॅन फिरता दवाखाना सर्व अद्यावत सोयीयुक्त गाडी प्राप्त झाली असून हा फिरता दवाखाना गावोगावी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करुन त्यांना औषधोपचार देण्यासाठी आजपासुन नागरिकांच्या सेवेत दाखल झाली आहे.

या मोबाईल हेल्थ व्हॅनचे लोकार्पण सोहळा तहसीलदार एफ आर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. बी वाय यादव, बार्शी रेड क्रॉस सचिव अजित कुंकुलोळ, डॉ विक्रम निमकर, दिलीप कराड बन्सीधर शुक्ला डॉ रामचंद्र जगताप, प्रताप जगदाळे ॲड प्रशांत शेटे अमर शुक्ला आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. बी. वाय यादव म्हणाले इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस दिल्ली यांच्याकडून इंडियन रेड क्रॉस सोसायटी बार्शी शाखेस सुमारे 50 लाख रूपये किमतीचे मोबाईल हेल्थ युनिट फिरता दवाखाना गाडी देण्यात आली आहे. या फिरत्या गाडीमुळे गावोगावी जाऊन नागरिकांना माफक दरात वैद्यकीय चाचण्या व उपचार सुविधा याद्वारे सेवा देणे शक्य होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल,असे सांगितले.

तसेच तहसीलदार शेख म्हणाले बार्शी रेड क्रॉस ने कोव्हीड काळात केलेल्या आरोग्य सेवेमुळे अनेक रुग्णांना मदत पोहचवली यामुळे नव्याने ही मोबाईल हेल्थ व्हॅन देऊन बार्शी रेड क्रॉस वर आरोग्य सेवेचा विश्वास टाकला आहे. या रेड क्रॉस फिरत्या दवाखाना उपक्रमाचे स्वागत केले. या सर्व उपचार पध्दतीमुळे शहर व तालुक्यातील तळागाळतील गरजु रुग्णांवर उपचार करणे सोयीचे होणार आहे.

या वेळी बोलताना अजित कुंकुलोळ म्हणले फिरत्या दवाखान्यामध्ये रुग्णांच्या तपासणीकरिता डॉक्टर आणि परिचारिका असणार असून तपासणीनंतर लागणारी औषधेही याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी ऑक्सिजन मशीनसह ECG, नोबिलाईझर, हृदय बंद पडल्यास शॉक देण्याची मशीन, रक्त तपासणी, ड्रेसिंग, सलाईन, तसेच इमर्जन्सीवेळी लागणाऱ्या औषधांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील काही ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला यांच्यासह इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी अडथळे निर्माण होत असतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांना औषधोपचारांसाठी त्रास सहन करावा लागून नये यासाठी तसेच सध्याच्या महागाईच्या दृष्टिकोनातून नागरिकांना किरकोळ आजारासाठी हॉस्पिटलचा खर्च न परवडण्यासारखा असल्यामुळे त्याचप्रमाणे जनतेचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी या फिरत्या दवाखान्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रेड क्रॉसचे अजित कुंकूलोळ यांनी केले आहे.