Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया सुरू करणे व वयोमर्यादा वाढीव करण्याबाबत – आ. राजेंद्र राऊत यांना निवेदन

महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया सुरू करणे व वयोमर्यादा वाढीव करण्याबाबत – आ. राजेंद्र राऊत यांना निवेदन

मित्राला शेअर करा

महाराष्ट्र पोलीस भरती सण 22 – 23 सुरू करणे तसेच वयोमर्यादा वाढीव मुदतपूर्व संपण्यापूर्वी भरती प्रक्रिया करण्याबाबतचे निवेदन पोलीस भरती सराव करणारे उमेदवारांनी दिले आहे

या निवेदनाद्वारे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी सध्या गृह विभागात अनेक पदे रिक्त असून लवकरात लवकर भरती कारवाई सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

मागील दिनांक 3 मार्च 2022 रोजी सामान्य प्रशासन विभागामार्फत दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे. त्यानुसार वाढीव मर्यादेची मुदत संपण्यापूर्वी म्हणजेच दिनांक 31 डिसेंबर 2023 पूर्वी पोलीस भरती जाहिरात काढून अर्ज भरून घेण्यात यावे अशी लेखी मागणी केली

या मागणीचा विचार झाल्यावर लाखो forf भरणारे पात्र उमेदवार भरतीला पात्र होतील. पोलीस भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशा आशयाचे पत्र बार्शी शहर व तालुक्यातील सर्व पोलीस भरती सराव करणारे विद्यार्थी यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना यावेळी दिले.