Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील जामगाव ( पा ) येथे ३३/११ KV नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील जामगाव ( पा ) येथे ३३/११ KV नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

मित्राला शेअर करा

बार्शी तालुक्यातील जामगाव ( पा ) येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ३३/११ किलो व्हॅटचे ( KV ) नवीन वीज उपकेंद्र उभारणीची पायाभरणी व भूमिपूजन आमदार राजाभाऊ राऊत व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

जामगाव (पा) येथील ग्रामस्थांनी आमदार राजाभाऊ राऊत यांच्याकडे नवीन वीज उपकेंद्र उभारणीची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीनुसार आमदार राजाभाऊ राऊत यांनी हे वीज उपकेंद्र मंजूर करण्यासाठी व उभारणीसाठी संबंधित खात्यांकडे सतत पत्र व्यवहार करून पाठपुरावा सुरू ठेवला होता. हा पाठपुरावा सुरू असताना काही बाबींच्या अडचणी निर्माण होत होत्या. त्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार महोदयांनी जामगाव पा येथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सोबत चर्चा करून त्या दूर केल्या. आमदार राजाभाऊ राऊत यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सोबत यशस्वी चर्चा करून प्रबोधन केल्यामळेच आज या ठिकाणी नवीन वीज उपकेंद्र उभारणीची योग आला आहे.

या नव्याने उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्राकरीता जामगाव (पा) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून २० लाख रुपये किंमतीची २ एकर जमीन खरेदी केली आहे. जवळपास अंदाजे २ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे हे वीज उपकेंद्र असून, याचा फायदा जामगाव (पा) व मळेगाव येथील शेतकरी बांधवांना होणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, वीज वितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता धनराज भारती, उपकार्यकारी अभियंता अरविंद भाग्यवंत, माजी उपसभापती केशव घोगरे, सोसायटी चेअरमन भाऊसाहेब सातपुते, सरपंच महंमद तांबोळी, उपसरपंच सुभाष मस्के, हनुमंत सातपुते, सहाय्यक अभियंता उमर शेख, सहाय्यक अभियंता प्रदीप करपे, राजेंद्र यादव, रियाज पठाण, दिनेश सातपुते सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.