Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > आमदार राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मतदान नाव नोंदणी शिबीर

आमदार राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मतदान नाव नोंदणी शिबीर

मित्राला शेअर करा

बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शीत तरुणांच्या माध्यमातून मोफत मतदान नाव नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात सुमारे 210 मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त राऊत यांनी बार्शी तालुक्यात झालेल्या ओल्या दुष्काळी परिस्थिती तसेच कोविड च्या परिस्थितीत मुळे आपला वाढदिवस सामाजिक भान जपत करण्यात यावा असे आवाहन केले होते त्याच आवाहनाला साथ देत शहरातील तरुण शुभम तुपे, समर्थ तुपे तसेच राजाभाऊ यांचे समर्थक यांच्या माध्यमातून शहरात मोफत मतदान नाव नोंदणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या शिबिरासाठी सर्व मित्रपरिवार आणि राजाभाऊ प्रेमी यांनी परिश्रम घेतले.