आपुलकी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पाथरूड व महा एनजीओ फेडरेशन पुणे यांच्या संयुक्ताने २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून निमित्त नळी वडगाव येथे माऊली वृद्धाश्रमांमध्ये फळे, धान्य व मास्क वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
या मदतीमुळे आश्रमातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर समाधान पहावयास मिळाले.तसेच महात्मा गांधी यांचीही जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी हरिभक्त पारायण व्यंकटेश महाराज चव्हाण यांनी आरोग्य विषयक प्रबोधन केले.आपुलकी बहूऊदेशीय सामाजिक संस्था ही नेहमी समाजउपयोगी कार्य करण्यात नेहमी सहभाग घेत असते.यापुढेही अशीच वृद्धाश्रमास मदत केली जाईल असे आपुलकी सामाजिक संस्था व महा एनजीओ यांच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी माऊली आश्रमाचे संस्थापक गहिनीनाथ महाराज लोखंडे, संदीप झणझणे,श्रीकांत शिकेतोडे,श्रावणी दरंदले व आश्रमातील कर्मचारी, सदस्य उपस्थित होते.या सर्वांचे कार्यक्रमाचे आभार राजेंद्र दरंदले सोनईकर यांनी व्यक्त केले.
More Stories
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील