रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हि योजना जाहीर केली आहे – यामध्ये रस्ते अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात नेल्यास 5000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे
15 ऑक्टोबर 2021 पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाईल – तसेच जिल्हा प्रशासनाकडून ही रक्कम दिली जाईल.
जाणून घ्या याविषयी सविस्तर
देशात अपघातात जखमी किंवा मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे अणि बर्याच वेळा कायद्यातील अडचणी आणि नंतर होणार्या चौकश्या या कारणास्तव अनेक लोक इच्छा असूनदेखील अपघातग्रस्तांना मदत करणे टाळतात परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.
केंद्र सरकारने म्हटले – रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत नवे पोर्टल सुरु केले जाईल – या पोर्टलवर जिल्हा प्रशासन दर महिन्याला जखमींना मदत करणाऱ्या नागरिकाचे नाव, पत्ता, आणि मोबाइल नंबर अशी माहिती समाविष्ट करेल
तसेच मदत करणाऱ्या व्यक्तीला जिल्हा प्रशासनाकडून 5000 रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार – मात्र ही रक्कम एका वर्षात जास्तीत जास्त पाच वेळा दिली जाणार
मदत करणार्यांना मिळणार संरक्षण काही घटनांमध्ये नागरिकांना स्वतःची ओळख देण्याची इच्छा नसते – अशा व्यक्तींना रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून कायदेशीर संरक्षण दिले आहे
यामध्ये पोलीस प्रशासन नागरिकाला ओळख,पत्ता आणि मोबाइल नंबर देण्यासाठी दबाव आणू शकणार नाही
तसेच एखाद्या नागरिकांना स्वेच्छेने आपली ओळख उघड करायची असल्यास ते करु शकतात किंवा साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर राहू शकतात – असे केंद्र सरकारने सांगितले
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक