मुंबई: पैसे मिळवण्यासाठी लोकांच्या जीविताशी खेळण्यास सुद्धा मागेपुढे पहात नाहीत अशी घटना उघडकीस आली आहे.
शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थाचा ८५ हजार २४० रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे.
शिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे यांना दि १४ मे २०२२ रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मे ए आर एम ट्रेडर्स ३८, तळमजला, रामगड हटमेंट, शिवडी मुंबई १५ या ठिकाणची तपासणी केली. चहा पावडर या अन्नपदार्थास खाद्यरंग लावून विक्रीसाठी साठा केला असल्याचा आढळला तसेच खाद्यरंग आढळून आला. हा साठा सकृतदर्शनी भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तेथून चहा पावडर व खाद्यरंग या अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेवून उर्वरित ४२९ किलोग्रॅमचा चहा पावडरचा साठा किंमत ८५ हजार २४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
संबंधित हजर व्यक्ती , पेढीमालक यांचे विरुद्ध शिवडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यात आलेली आहे. ही कारवाई म.ना.चौधरी, सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई व एस. एस. जाधव, सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ ३ यांचे मार्गदर्शनाखाली ल.सो.सावळे, अन्न सुरक्षा अधिकारी, र.ज.जेकटे, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद